ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. मावळी मंडळ, जय बजरंग वशिंद, तर महिला गटात शिवतेज संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटात एकता क्रीडा मंडळ उल्हासनगर विरुद्ध राहुल क्रीडा मंडळ कल्याण यांच्यात उद्धाटन सामना झाला. एकता क्रीडा मंडळ उल्हासनगर संघाने ३४-०६ असा एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. मात्र दुसऱ्या फेरीत एकता संघाला २४-३३ असा मावळी मंडळाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. तर मावळी मंडळाने पहिल्या फेरीत आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली संघाचा २५-१७ असा विजय मिळवला होता. मावली मंडळ दोन विजयासह उपांत्य फेरीत पोहचला.
मोरया सोनाळे विरुद्ध जय बजरंग क्रीडा मंडळ वशिंद यांच्यात झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत जय बजरंग क्रीडा मंडळ वशिंद संघाने ४०-२५ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत केला. मोरया संघाने पहिल्या फेरीत जय चेरोबा संघाचा २५-१८ असा पराभव केला होता तर जय बजरंग वशिंद संघाने ३३-१३ असा गावदेवी क्रीडा मंडळ डोंबिवली संघावर विजय मिळवला होता.
किल्ले माहुली शहापूर विरुद्ध श्री समर्थ क्रीडा मंडल कल्याण यांच्यात महिलाचा उद्घाटन सामना झाला. मध्यंतरापर्यत १०-१० असा बरोबरीत असलेला सामना किल्ले माहुली शहापूर संघाने १८-१६ असा विजय मिळवला. संकल्प सिद्धी मंडळाने २६-२४ असा संघर्ष क्रीडा मंडळावर विजय मिळवला. महिला गटात झालेल्या शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध शहापूर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत शिवतेज संघाने ३८-१८ असा विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवीन कर्णधार; डूप्लेसिस ऐवजी हा खेळाडू करणार नेतृत्व
वाचा👉https://t.co/BvGtzI7Egt👈#म #मराठी #Cricket #SAvENG @QuinnyDeKock69— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
"उल्हासनगर महापौर कबड्डी चषक" स्पर्धा आजपासून
वाचा👉https://t.co/TbM2wIhid5👈#म #मराठी #Kabaddi— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020