पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) बुधवारी क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुल्तान सुल्तान्स यांच्यात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज उमर गुल नवा इतिहास रचला.
क्वेटा ग्रॅडिएटर्सने संघ जरी शेवटच्या षटकात मारत विजयी झाला असला तरी चर्चा झाली ती उमर गुलचीच.
गुलने या सामन्यात ४ षटकात २४ धावा देत ६ विकट्स घेतल्या परंतू ही कामगिरी संघाला विजय मिळवून देवू शकली नाही.
या सामन्यात सामनावीर ठरलेला उमर गुल टी२० या क्रिकेटच्या प्रकारात वेगवान २०० विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. त्याने १४७ सामन्यात २०१ विकेट्स घेतल्या आहेत.
टी२० प्रकारात वेगवान २०० विकेट्स घेणारे गोलंदाज
१३९ सामने- सईद अजमल
१४७ सामने- उमर अकमल
१४८ सामने- लसीथ मलिंगा
१५१ सामने- शाॅन टेट
१५४ सामने- सुनील नारायण