भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याला इंदोर येथे बुधवारपासून (दि. 1 मार्च) सुरुवात झाली आहे. 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy 2023) कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कशीबशी शंभरी पार करता आली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर तळाच्या फलंदाजांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, मालिकेतील आपला पहिलाच सामना खेळत असलेला वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनी आपल्या छोटेखानी खेळीत एक मोठा विक्रम आपल्याकडे खेचून आणला.
भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना या सामन्यातही अपयश आले. भारताने आपले 8 गडी केवळ 88 धावांत गमावलेले. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उमेश यादव उतरला. त्याने भारतीय संघाचा डाव शंभरी पार नेण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने एक चौकार व दोन षटकार लगावत 13 चेंडूवर 17 धावा केल्या. या दोन षटकारासह त्याने भारताच्या दोन दिग्गजांना कसोटी क्रिकेटमध्ये मागे सोडले.
उमेशने आपल्या आत्तापर्यंतच्या कसोटी कारकीर्द 24 षटकार ठोकले आहेत. याबाबतीत त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याची बरोबरी केली. तर, भारताचे माजी कर्णधार व दिग्गज अष्टपैलू रवी शास्त्री व सिक्सर किंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंग यांना मागे टाकले. शास्त्री यांनी आपल्या कारकीर्दीत 80 कसोटी सामने खेळताना 22 षटकार खेचलेले. दुसरीकडे युवराजने आपल्या 40 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 22 वेळा चेंडू सीमापार भिरकावलेला.
भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वीरेंद्र सेहवाग 90 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, दुसऱ्या स्थानी माजी कर्णधार एमएस धोनी असून त्याने 78 षटकार मारले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून, त्याने 69 षटकार मारले होते. तसेच, विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्मा चौथ्या स्थानी असून त्याचे 68 षटकार आहेत.
(Umesh Yadav Hits More Test Sixes Than Yuvraj Singh And Ravi Shastri Equals Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमेश यादवने स्वतःच्या विक्रमाची बरोबरी करूनही विराटकडून फूल सपोर्ट, षटकार मारल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता