सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२१ हंगामात गुणतालिकेमध्ये सध्या शेवटच्या स्थानावर आहे, पण त्यांचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने त्याच्यांकडून पहिलाच सामना खेळताना अनेक विक्रम केले आहेत. उम्रानने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पदार्पण सामन्यात १५१.०३ च्या वेगाने गोलंदाजी केली आणि या आयपीएल २०२१ मध्ये सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा भारतीय बनला आहे.
जरी या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नसली आणि त्याच्या संघाने हा सामना ६ गडी राखून गमावला असला, तरी उम्रानने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलच्या या मोसमात केवळ दिल्लीचा एन्रीच नॉर्किए आणि कोलकाताचा लॉकी फर्ग्युसनने त्याच्यापेक्षा अधीक वेगवान गोलंदाजी केली आहे.
कोलकाताच्या फलंदाजांना उम्रान मलिकचे वेगवान चेंडू खेळताना खूप त्रास झाला. त्याला एकही विकेट मिळाली नाही, पण त्याने त्याच्या चार षटकात फक्त २७ धावा दिल्या. त्याने कोलकाताच्या खेळाडूंना रोखून धरले होते. आयपीए २०२१ मध्ये सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या दहा गोलंदाजांच्या यादीत उम्रान मलिक हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. उम्रान या यादीत सातव्या स्थानी आहे.
त्याच्या व्यतिरिक्त या यादीत, केवळ नॉर्किए आणि फर्ग्युसन यांचे वर्चस्व आहे. लॉकी फर्ग्युसनने या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आपले नाव नोंदवले आहे. त्याने १५२.७५ च्या वेगाने गोलंदाजी केली आहे, तर नॉर्किएने १५१.७१ च्या वेगाने गोलंदाजी केली आहे. या यादीत तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.
WATCH: Umran Malik bowled a 1️⃣5️⃣0️⃣ KMPH delivery 🔥⚡🤯
On #VIVOIPL debut and he showcases his FULL PACE 🔝💪🏻 #KKRvSRH @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021
हैदराबाद संघात टी नटराजनच्या जागी उम्रान मलिकचा समावेश करण्यात आला आहे. टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे त्याला आयपीएलचा हा हंगाम अर्ध्यातून सोडावा लागला. उम्रानने त्याच्या पहिल्या सामन्यात ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, त्याला हैदराबादच्या शेवटच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता दाट आहे. कोलकाताविरुद्ध आयपीएल पदार्पण करण्यापूर्वी उम्रानने जम्मू -काश्मीरसाठी एक टी-२० आणि अ दर्जाचा सामना खेळला. यादरम्यान त्याने एकूण चार विकेट्स घेतल्या होत्या.
जम्मू -काश्मीरचा तो चौथा खेळाडू आहे, ज्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या आधी परवेज रसूल, रसीख सलाम आणि अब्दुल सामद आयपीएल खेळले आहेत. परवेज रसूल आणि अब्दुल समद हे देखील हैदराबादकडूनच आयपीएल खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
“भारताकडे पाकिस्तानसारखे सर्वोत्तम खेळाडू नाहीत, म्हणूनच ते आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत”