यू पी योध्दाजची प्रो-कबड्डी लीगमधील आगमन दमदार झाले होते. त्यांनी 2017 च्या आपल्या पहिल्याच सत्रात प्ले-आॅफमधे धडक मारली होती.
गेल्या सत्रात योध्दाजचा स्टार राहीलेला नितीन तोमरला यावेळी आपल्याकडे राखू शकले नाहीत. मात्र रिशांक देवाडीगा सारखा चपळ चढाईपटूला आपल्याकडे पुन्हा घेतले आहे.
योध्दाजला यावेळच्या लिलावात फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच संघाचा समतोलही साधता आला नाही.
यू पी योध्दाज संघात रेडर्स सोडले तर बाकी विभागात खूप ऊणिवा स्पष्ट जाणवतात.त्यांना पूर्णपणे रिशांक आणि प्रशांतवर अवलंबून रहावे लागणार आहे.
प्रशांत हा मेंगलोर शहरातील असुन दुसऱ्या दिवशी त्याला लिलावात सर्वाधिक बोली लागली. या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धा तसेच फेडरेशन कपमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
महाराष्ट्रीतील एक स्टार खेळाडू परंतु रेल्वेकडून खेळणाऱ्या श्रीकांत जाधवचाही या संघाच्या तोफखान्यात समावेश आहे.
या संघात जीवा कुमार सारखा अनुभवी खेळाडू बचाव फळीत आहे. या वर्षीच्या लीगमधील तो एक महागडा बचाव फळीतील खेळाडू ठरला आहे. त्याला नितेश कुमार, पंकज, सचिन कुमार, नितिन मावी, अमित आणि विशाल चौधरी हे कसे साथ देतात हे पहाणं महत्त्वाच ठरणार आहे.
या संघात एकूण ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु यात एकही मोठं नावं नाही.त्यामुळे केवळ रिशांक, श्रीकांत आणि प्रशांत यांच्या कामगिरीवर अवलंबून रहाणं या संघाला महागात पडू शकतं.
असा असेल यू पी योध्दाजचा संघ
रेडर्स: रिशांक देवाडीगा, श्रीकांत जाधव, सुलेमान कबीर, आझाद सिंग, प्रशांत कुमार राय, भानू प्रताप राय, आझाद सिंग.
अष्टपैलू: सेआँग रिऔल किम, सागर कृष्णा, अक्रम शेख, नरेंदर.
बचावपटू: जीवा कुमार, नितेश कुमार, पंकज, सचिन कुमार, नितिन मावी, अमित, विशाल चौधरी
महत्त्वाच्या बातम्या-
–कबड्डी चाहत्यांसाठी खुषखबर, या चॅनेलवर पहा कबड्डी मास्टर्स दुबईचे सामने!
–संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने