---Advertisement---

ख्वाजाची पाकला सजा, धावांचा पाऊस पाडत घेतली यजमानांची मजा; नोंदवला मोठ्ठा रेकाॅर्ड

Usman-Khawaja
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली ३ सामन्यांची कसोटी मालिका सध्या रोमांचक स्थितीत आहे. या मालिकेतील पहिले २ सामने अनिर्णीत राहिल्यानंतर तिसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी ३५१ धावांचे मोठे आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने शानदार शतक ठोकत विक्रमांचे मनोरे रचले आहेत.

त्याची या संपूर्ण मालिकेतील फलंदाजीतील कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यापासूनच यजमान पाकिस्तानच्या (PAK vs AUS) नाकात दम करून ठेवला आहे. त्यातही लाहोर येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील (Third Test) पहिल्या डावात त्याला त्याचे शतक पूर्ण करता आले नव्हते. तो पहिल्या डावात ९१ धावांवर झेलबाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने १७८ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा (Usman Khawaja Century) फटकावल्या.

यासह तो पाकिस्तानात येऊन पाकिस्तानविरुद्ध ४ किंवा त्यापेक्षा जास्त डावांमध्ये सर्वाधिक सरासरीने फलंदाजी करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंतच्या ५ कसोटी डावांमध्ये मिळून पाकिस्तानविरुद्ध १६५.३३ च्या जबरदस्त सरासरीने धावा चोपल्या आहेत. ही पाकिस्तानात पाहुण्या खेळाडूची सर्वाधिक कसोटी सरासरी (Highest Test Average By Visiting Player)आहे. 

पाकिस्तानच्या भूमीवर पाहुण्या फलंदाजाची सर्वोच्च कसोटी फलंदाजीची सरासरी (किमान ४ किंवा अधिक डाव)
१६५.३३ – उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
११२.२५ – डेविड गोवर (इंग्लंड)
१०१.०० – टेड डेक्सटर (इंग्लंड)
९४.८३ – संजय मांजरेकर (भारत)
९१.५० – वीरेंद्र सेहवाग (भारत)

हेही वाचा- जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ

याखेरीज ख्वाजा ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पाकिस्तानात येऊन सर्वाधिक धावा कुटणाराही दुसरा पाहुणा फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात ९७ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने अनुक्रमे १६० आणि नाबाद ४४ धावा चोपल्या होत्या. पुढे तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावातील ९१ आणि नाबाद १०४ धावांची भर टाकत त्याने पाकिस्तानविरुद्ध संपूर्ण कसोटी मालिकेदरम्यान एकूण ४९६ धावा कुटल्या आहेत. 

ख्वाजापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटरटू मार्क टेलर यांनी पाकिस्तानात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक ५१३ धावा कुटत हा विक्रम आपल्या नावे केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणून आयपीएल भारीये.! रविंद्र जडेजाचा संघर्ष पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘इथे कष्टाचं फळ मिळतंच’

महिला विश्वचषक | पाकिस्तानवरील इंग्लंडच्या विजयाने भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग बनला कठीण, पाहा समीकरण

‘चांगले प्रदर्शन करण्यासाठी मैदानाबाहेर सर्वात चांगले मित्र असण्याची गरज नाही’, गौतम गंभीरचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---