ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून प्रचंड लोकप्रिय अशी बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. बिग बॅश लीग मध्ये क्रिकेट रसिकांना मोठ्याप्रमाणावर उत्कंठावर्धक सामने बघायला मिळत आहेत, या सोबतच ही स्पर्धा इतर मजेशीर गोष्टींसाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असते. नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन हिट व पर्थ स्कॉरर्चरमधील सामन्याच्या नाणेफेकीवेळी देखील असाच एक मजेशीर प्रसंग घडला.
बिग बॅश लीगमध्ये नाणेफेक करण्यासाठी बॅटचा उपयोग केला जातो. जेव्हा पहिल्यांदा बॅट फेकण्यात आली तेव्हा ती उभ्या रेषेत पडली. त्यामुळे दुसऱ्यांदा बॅट फेकण्यात आली. यावेळी देखील बॅट सरळ रेषेतच राहिली. अखेर तिसऱ्यांदा बॅट फेकल्यानंतर ती योग्यरीत्या खाली पडली व सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट चाहत्यांनी देखील त्यावर मजेशीर कमेंट केलेल्या आहेत.
This deserves a super over at the very least! #BBL10 pic.twitter.com/1YjK1jqfVG
— Ajesh Ramachandran (@Edged_and_taken) February 4, 2021
दरम्यान, सामन्याचा विचार केला असता, पर्थ स्कॉरर्चरने ब्रिस्बेन हिटचा डकवर्थ लुईस नियमाद्वारे 49 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पर्थ स्कॉरर्चरने 18.1 षटकात 1 गडी 189 धावांपर्यंत मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे पर्थचा डाव तेथेच थांबवण्यात आला व ब्रिस्बेनला 18 षटकात 200 धावांचे लक्ष देण्यात आले. प्रत्युत्तरात ब्रिस्बेनचा संघ 18 षटकात 9 गडी गमावत केवळ 150 धावाच करू शकला व पर्थने 49 धावांनी सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग चौथ्या वर्षीही विराट देशातील सर्वात मोठा सेलिब्रिटी; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची आहे ब्रँड व्हॅल्यू
अशा सहा गोष्टी ज्यांच्यावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान असेल सर्वांचेच लक्ष
बाबो.. ही कसली स्टाईल! टी१० लीगमधील खेळाडूची गोलंदाजी खूपच विचित्र, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क