भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी सध्या आपल्या रांची शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका संपल्यावर हा खेळाडू रांची येथे टी२० मालिकेसाठी आला आहे.
त्यात धोनी हा प्राणीप्रेमी आहे हेही आता सर्वांना माहित आहे. एवढेच नाही तर धोनीच्या ट्विटरवर देखील तसे लिहिले आहे. धोनीची पत्नी पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका विडिओमध्ये टायचे प्राणीप्रेम दिसते. यात हा महान खेळाडू आपल्या कुत्राबरोबर खेळताना दिसत आहे.
यात धोनीचा सॅम नावाचा कुत्रा हा धोनीच्या सर्व कृती हुबेहूब करताना दिसत आहे. यात धोनी जर डाव्या बाजूला झुकला तर सॅमपण डाव्या बाजूला झुकतोय. धोनीने पुढेही सूचना देईपर्यंत तो शांत बसतो.
हा विडिओ अंदाजे १५ तासांपूर्वी शेअर केलेला असून त्याला १ लाख ८२ हजार लाइक्स आले आहेत. तर तब्बल २ हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/BZ1ABO5F2Rg/?taken-by=sakshisingh_r
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली टी२० ७ ऑक्टोबर रोजी रांची येथे होणार आहे. धोनी सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
https://www.instagram.com/p/BQmf7enjHGd/
https://www.instagram.com/p/BRYkWEpjRXk/