येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा मोठा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या संघात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु या संघात नवदीप सैनीला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो सध्या घरीच आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने आपल्या ट्विटर हँडलवर एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन, हार्ले डेविडसन बाईकवर बसून शेतातील माती उडवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये त्याने मास्क देखील घातला नाहि. हा व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
https://twitter.com/navdeepsaini96/status/1398893297830023170
हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले कि, “भावा खेळण्यावर लक्ष दे हवाबाजी करशील तर हवेतच फिरशील. खेळात कौशल्य असणे गरजेचे नसते तर , मेहनत ही तितकीच घ्यावी लागते. तुला माहीतच असेल कि सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांमध्येही कौशल्य होते. परंतु निकाल तुलाही चांगलाच माहित आहे, माझ्या मित्रा.”
https://twitter.com/VikashS24786169/status/1398902948046917634
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले कि, “तेच म्हणतोय मी प्रदूषण इतकं का वाढत आहे.” तर आणखी एका युजरने त्याला ट्रोल करत लिहिले कि,” जास्त हिरो बनू नकोस २ वर्ष ही नाही झाले सिलेक्ट होऊन.”
Someone from Environment team please check is this allowed as pollution level might get high due to this..if this was done by any normal.person tab kya allowed tha
— Ajay Roy Choudhary (@ajayroyjamshedp) May 30, 2021
https://twitter.com/theprayagtiwari/status/1398907281580855300
https://twitter.com/nawaabshahab/status/1398917307733143554
https://twitter.com/Rebel_notout/status/1398900440134266884
I saved this tweet 😂 , ab agar diwali pe gyan diya tho 🤣🤣😂😂
— Pãrvésh tanwar (@ParveshTanwarrr) May 30, 2021
https://twitter.com/_iGod/status/1399270525696872449
He has earned his new bike after contributing to India so in my opinion he deserves to show off.
Since the bike is BS6 i think few second video with burnout isnt going to harm the nature.. and about dust? Its open wide area so its also fine.
Cool bike @navdeepsaini96 🤟
— Rahul Rana (@RahulRana_me) May 31, 2021
नवदीप सैनीची कामगिरी
नवदीप सैनीने २०१९ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकूण ७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला ६ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच टी२० क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण १० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ११ गडी बाद केले आहेत. यासोबतच त्याने, २ कसोटी सामन्यात ४ गाडी बाद केले आहेत. त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळाली नसली तरीही आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात स्थान दिले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
ईशान किशनचे झाले ब्रेकअप? गर्लफ्रेंड आदितीच्या पोस्टवरुन चर्चेला उधाण
‘माझे हेडफोन्स कुठे आहेत?’, अनुष्काने विचारलेल्या प्रश्नावर विराटने दिले भन्नाट प्रत्युत्तर