fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

माजी क्रिकेटपटू असलेल्या वडिलांच्या ओठांना लिपस्टिक लावणे मुलीला पडले महागात

पाकिस्तानचे दिग्गज फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद आणि त्याची मुलगी होतेय सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई ।पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद आणि त्याच्या मुलीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होता आहे. या व्हिडिओमध्ये मुश्ताक अहमद झोपले असून त्यांची मुलगी ओठांना लिपस्टिक लावता आहे. परंतु पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सला हा व्हिडिओ पसंत पडला नसून त्यांनी मुश्ताक अहमद आणि त्यांच्या मुलीला ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली आहे.

मुश्ताक अहमदच्या मुलीचे नाव सुमिया असून फॅन्संनी तिच्या कपड्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. लोकांना धर्माचं ज्ञान देणाऱ्या मुस्ताक अहमद हे आपल्या मुलीला सांभाळू शकत नाहीत अशी तिखट प्रतिक्रिया एका फॅन्सने कमेंट्स द्वारे दिली आहे. वास्तविक पाहता मुश्ताक यांची मुलगी वयाने खूपच लहान आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळताना मुश्ताक अहमद यांनी दर्जेदार प्रदर्शन केले. त्यांच्या नावावर 185 कसोटी आणि 161 एक दिवसीय बळी घेतल्याची नोंद आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 407 बळी घेतल्याची नोंद आहे.

मुश्ताक अहमद यांच्यापूर्वी फिरकी गोलंदाज सकलेन मुस्ताक यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते आपल्या ओठांना लिपस्टिक लावले होते. सकलेन याने ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात त्यांनी महिलांचे विंग घातले होते आणि ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती. यासोबतच डोळ्यांना लायनर देखील लावून मेकअप केले होते. त्यांचा हा मेकअप त्यांच्या मुलीने केला असल्याचे त्यांनी सांगितले .

 

You might also like