पुणे। बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे क्लासिकल रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, पुण्याचा आदित्य सामंत, एफएम सौरव खेर्डेकर, स्वाती घाटे या खेळाडूंनी 1 गुणांसह विजयी सलामी दिली.
अश्वमेध हॉल, पुणे येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत रेल्वेच्या आयएम विक्रमादित्य कुलकर्णीने गोव्याच्या रुजेश रायकरचा पराभव करून 1 गुण प्राप्त केला. तर, पुण्याच्या आदित्य सामंतने सुरज कुलकर्णीचा तर, एफएम सौरव खेर्डेकरने श्लोक शरणार्थीचा पराभव करून शानदार सुरुवात केली.
स्पर्धेचे उदघाटन ट्रूस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक व पीडीसीसीचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, रवींद्र अकोलकर, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे, चीफ आर्बीटर नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: व्हाईट व ब्लॅक नुसार: पहिली फेरी:
आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(रेल्वे)(1गुण)वि.वि.रुजेश रायकर(गोवा)(0गुण);
सुरज कुलकर्णी(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.आदित्य सामंत(महाराष्ट्र)(1गुण);
एफएम सौरव खेर्डेकर(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.श्लोक शरणार्थी(महाराष्ट्र)(0गुण);
सोनम ठाकूर(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.अनदकत कर्तव्या(गुजरात)(1गुण);
डब्लूजीएम स्वाती घाटे(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.अक्षज पाटील(महाराष्ट्र)(0गुण);
उत्तरा शेलटकर(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.सिद्धांत गायकवाड(महाराष्ट्र)(1गुण);
ईशान नाडकर्णी(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.ऋत्विक रायकर(गोवा)(0गुण);
निहिरा कौल(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.करण त्रिवेदी(गुजरात)(1गुण);
जीत शहा(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.आदित्य सक्सेना(महाराष्ट्र)(0गुण);
कपिल एरकुला(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.अक्षय बोरगावकर(महाराष्ट्र)(1गुण);
रित्त्विक कृष्णन(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.रोहित चौधरी(गोवा)(0गुण);
तेजस जाधव(महाराष्ट्र)(0गुण)पराभूत वि.अंकित चुडासामा(गुजरात)(1गुण);
सिद्धांत ताम्हणकर(महाराष्ट्र)(1गुण)वि.वि.स्वराली कोठे(महाराष्ट्र)(0गुण).