आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सोमवारी (१८ ऑक्टोबर) सराव सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचा मेंटोर एमएस धोनी हे दोघेही एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एमएस धोनी ज्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता, त्यावेळी विराट कोहली संघाचा उपकर्णधार होता. या दोघांमध्ये नेहमीच काही ना काही चर्चा सुरू असायची. असेच काहीसे चित्र या सामन्यापूर्वी देखील पाहायला मिळाले. विराट कोहली मैदानावर जितका आक्रमक आहे तितकाच मैदानाच्या बाहेर तो खोडकर आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आपल्या बोटाने एमएस धोनीच्या हाताला स्पर्श करताना दिसून येत आहे. हे पाहून असं वाटतंय की, विराट कोहली चेक करतोय की, हे स्वप्नं तर नाहीये ना? की एमएस धोनी परतला आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. एका युजरने हा फोटो ट्विट करत लिहिले की, “क्रिकेटमधील सर्वात पवित्र नाते- विराट कोहली आणि एमएस धोनी” तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील हे फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “फोटो जे आम्हाला पाहायला आवडतात….” तर बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोवर त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले की, “हलक्या मनाची संभाषणे अशीच असतात..”
Purest Bond in Cricket. – Virat Kohli and MS Dhoni. pic.twitter.com/WflwNPEjey
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 18, 2021
Images we love to see. 🤩#PlayBold #TeamIndia #ViratKohli #MSDhoni pic.twitter.com/O11JT0A7HY
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 18, 2021
Captain with the mentor 🇮🇳@MSDhoni • #MSDhoni • #TeamIndia pic.twitter.com/SXj79w87iI
— Akash @tweets (@CherryAakash) October 18, 2021
या सराव सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाला २० षटक अखेर १८८ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ४९ मोईन अलीने ४३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना ईशान किशनने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नानावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आजमने झळकावलं अर्धशतक, सराव सामन्यात पाकिस्तानचा वेस्टइंडीजवर दणदणीत विजय
‘दोन दिग्गज, एक संस्मरणीय क्षण!’, बीसीसीआयने शेअर केलेले धोनी-गेलचे फोटो तुफान व्हायरल
क्लीन बोल्ड! शमीच्या अप्रतिम चेंडूने उडवला धोकादायक बटलरचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ