भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नाताळच्या उत्सवापूर्वीच मुलांच्या इच्छा पूर्ण करताना दिसला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एक छोट्या व्हिडिओमध्ये कोहलीने सांताक्लाॅजचा ड्रेस परिधान केलेला दिसून आला आहे.
हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत असून अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच कोहलीची एक वेगळीच बाजू चाहत्यांना पहायला मिळाली आहे.
हा व्हिडिओ 2 मिनिटे 51 सेकंदाचा आहे. व्हिडिओच्या सुरूवातीस, मुले त्यांच्या इच्छेबद्दल सांगतात. काहींनी सांताक्लॉजकडून बॅडमिंटनची मागणी केली तर काहींनी फुटबॉलची मागणी केली.
काही मुलांनी धोनी, पीव्ही सिंधू, सचिन यांना आवडते खेळाडू म्हटले, तर एकाने सांगितले की मला कोहलीची दाढी खूप आवडते. हे ऐकून विराट कोहली हसला. सर्व मुले एका खोलीत बसून नाताळ गाणे गात असताना लाईट जाते. पण या दरम्यान, सांताक्लॉजच्या ड्रेसमध्ये कोहली मुलांमध्ये येतो.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1207927652079812608
मात्र त्यावेळी मुलांनी कोहलीला ओळखले नाही आणि कोहली म्हणतो ‘मला माहित आहे की तुम्ही खूप खोडकर आहात पण जर नाताळ असल्याने तर प्रत्येकाला भेटवस्तू मिळेल. यानंतर कोहली बऱ्याच भेटवस्तू घेऊन मुलांमध्ये वाटतो.
पण शेवटी एक माणूस मुलांना सांगतो की स्पायडर मॅन आणि सुपरमॅन सुट्टीवर आहेत म्हणून तूम्ही विराटला भेटणार का. यावर सर्व मुलांनी होकार दिला, त्याचवेळी कोहलीने टोपी आणि दाढी काढली. कोहली समोर पाहून मुले खूप आनंदी झालेलीही या व्हिडिओमध्ये दिसली.
हा क्षण अतिशय खास असल्याचे सांगताना कोहलीने या व्हिडिओतून सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…
वाचा👉https://t.co/EqoKENKJrf👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019