इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १९वा सामना सोमवारी (५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा दोन्ही संघांचा हा या हंगामातील ५वा सामना होता. या सामन्यादरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टी२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पहिल्या ३ सामन्यात विशेष कामगिरी करु न शकलेला विराट राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना दिसला. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात विराटने ५३ चेंडू खेळत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावा ठोकल्या. त्यामुळे विराट टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या केवळ १० पावले दूर होता.
मात्र दिल्लीविरुद्धच्या सामन्यात या धुरंधरने १० धावा करत टी२० क्रिकेटमधील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराटने टी२० क्रिकेटमधील ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह टी२० क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील ७वा क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २८६ सामने खेळत ९००० धावा केल्या आहेत. यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५५०२ धावांचा समावेश आहे.
विराटपुर्वी ख्रिस गेल (१३२९६ धावा), कायरन पोलार्ड (१०३७० धावा), शोएब मलिक (९९२६ धावा), ब्रेंडन मॅक्यूलम (९९२२), डेविड वॉर्नर (९४५१) आणि ऍरॉन फिंच (९१४८) यांनी टी२० क्रिकेटमध्ये ९००० धावांचा आकडा गाठला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आमची ‘ही’ योजना कधीच बदलत नाही; विजयानंतर धोनीने पहिल्यांदाच सांगितले संघाचे रहस्य
तो एकटा काय करणार? धोनीच्या मदतीला धावून आला त्याचा जुना मित्र; टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर
ट्रेंडिंग लेख-
‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान
आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी