भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत गणना होते. विराटचं विक्रमांशी खास नातं आहे. अगदी कमी कालावधीतच क्रिकेटमधील मोठमोठे विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी त्याच्याकडे असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांचे वनडे सामन्यांचे काही विक्रम मोडू शकतो.
• विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत शतक ठोकले, तर तो रिकी पॉन्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल. सचिन तेंडुलकरनंतर(100) रिकी पाँटिंगने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.
• विराटने वनडे मालिकेत एक शतक ठोकले, तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या यादीत तो अव्वल स्थानी असलेल्या रिकी पॉन्टिंगची बरोबरी करेल. कर्णधार म्हणून पॉन्टिंगने 22 वनडे शतके ठोकली आहेत. तर सध्या कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर 21 वनडे शतके आहेत
• वनडे मालिकेत सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडण्याची संधीही विराटकडे आहे. विराटने एक शतक ठोकले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे 9 वनडे शतके होतील आणि तो सचिनच्या शतकांची बरोबरी करेल. सध्या विराटच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ वनडे शतकांची नोंद आहे.
• विराट कोहलीला वनडे सामन्यात 12 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या 133 धावांची गरज आहे. जर त्याने या मालिकेत 12 हजार धावा पूर्ण केल्या, तर वनडेत तो सर्वात वेगवान 12 हजार धावा करणारा फलंदाज ठरेल.
• जर विराटने वनडे मालिकेत 116 धावा केल्या, तर परदेशात त्याच्या 5000 वनडे धावा पूर्ण होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
…..म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या वनडेत काळी पट्टी बांधून उतरतील मैदानात
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ
ब्रेकिंग! इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘आऊट’
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर
लहानपणी अनेकवेळा रॅगिंग झालेला तरीही न खचता पुढे भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेला रैना