उद्यापासून (24 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
या मालिकेत जर विराटने 81 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. तसेच तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकेल.
सध्या भारतीय कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 37.06 च्या सरासरीने 1112 धावा केल्या आहेत.
तसेच विराटने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून 33 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 46.90 च्या सरासरीने 1032 धावा केल्या आहेत.
विराट कोहली आणि केन विलियम्सनमध्ये असेल शर्यत –
सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नावावर आहे. त्याने 40 सामन्यात 1273 धावा केल्या आहेत. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर धोनी आहे.
तसेच डू प्लेसिस आणि धोनी पाठोपाठ या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे केन विलियम्सन आणि विराट कोहली आहे. विलियम्सनने कर्णधार म्हणून 39 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 30.94 च्या सरासरीने 1083 धावा केल्या आहेत.
त्यामुळे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्यासाठी आणि फाफ डू प्लेसिसला मागे टाकण्याची विराट आणि विलियम्सन या दोघांनाही संधी आहे. त्यासाठी विलियम्सनला 191 धावांची तर विराटला 242 धावांची गरज आहे. यामुळे आता या दोघांमध्ये असणारी ही शर्यत कोण जिंकणारे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –
1273 धावा – फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)
1112 धावा – एमएस धोनी (भारत)
1083 धावा – केन विलियम्सन (न्यूझीलंड)
1032 धावा – विराट कोहली (भारत)
बरोबर ३ वर्षांपुर्वी वनडे पदार्पण केलेल्या बुमराहबद्दल जगाला या ३ गोष्टी माहित नाहीत
वाचा👉https://t.co/is14Rya8cK👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता होणार कट?
वाचा👉https://t.co/DTLetLkJNs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020