क्रिकेट आणि सिनेसृष्टीचे नाते खूप जुने आहे. कित्येक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्न केले आहे. अशीच एक जोडी आहे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रसिद्ध बॉलिवूड नायिका अनुष्का शर्मा यांची. चाहत्यांमध्ये ही जोडी ‘विरुष्का’ या नावाने ओळखली जाते. सध्या अनुष्का तिच्या प्रेगन्सीमुळे चर्चेत आहे. पण खूप कमी लोकांना माहिती असेल की, मैदानावर नेहमी आत्मविश्वासाने क्रिकेट खेळणारा विराट अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीवेळी नर्वस झाला होता.
जाहिरातीच्या शूटींगमध्ये झाली पहिली भेट
विराट-अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटींगदरम्यान झाली होती. त्या जाहिरातीपुर्वी विराटने कोणत्याही अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे अनुष्कासमोर तो खूप नर्वस झाला होता. एका मुलाखतीमध्ये बोलताना विराटने या गोष्टीचा खुलासा केला होता.
“मी अनुष्काशी पहिल्यांदा एका शॅम्पूच्या जाहिरातीची शूटींग करतेवेळी भेटलो होतो. तब्बल तीन दिवस ही शूटींग चालली होती. माझ्या मॅनेजरने मला आधीच सांगितले होते की, मला ही जाहिरात अनुष्का शर्मासोबत करायची आहे. हे ऐकूनच मी गोंधळून गेलो होतो. ती एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. मी तिच्यासोबत अभिनय करू शकेल का नाही? याची मला भिती वाटत होती. त्यानंतर माझ्या मॅनेजरने माझी समजूत काढली होती. तरीही मी प्रत्यक्षात तिला भेटल्यानंतर खूप नर्वस झालो होतो,” असे विराटने त्या मुलाखतीत सांगितले होते.
विशेष म्हणजे, याच जाहिरातीच्या शूटींगमुळे विराट आणि अनुष्का चांगले मित्र बनले. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. पुढे त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर २०१७ साली इटलीमध्ये ते लग्नबंधनात अडकले. लवकरच ही जोडी आई-वडीलदेखील बनणार आहे.
विराट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
कर्णधार विराट कोहली सध्या भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका पार पाडल्यानंतर दोन्ही संघात कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना ऍडलेड येथे पार पडला असून ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने भारताला पराभूत केले आहे. या सामन्यानंतर आता लवकरच विराट भारतात परत येण्यासाठी रवाना होईल. त्याने पालकत्व रजा घेतल्याने तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित ३ कसोटी सामने खेळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: तूला मानलं पाहिजे भावा! ‘या’ ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने अवघ्या १५ चेंडूत ठोकले अर्धशतक
बीसीसीआयने तातडीने द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे, ‘या’ भारतीय दिग्गजाचा सल्ला
जडेजाचा हलगर्जीपणा बेतला असता रोहित आणि रहाणेच्या जीवावर; ‘हिटमॅन’चा धक्कादायक खुलासा