भारताचा कर्णधार विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश असणाऱ्या चेंडू छेडछाड प्रकरणाबाबत त्याची मते व्यक्त केली आहेत.
याबद्दल तो foxsports.com.au.साठी अॅडम गिलख्रिस्टने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होता. विराट म्हणाला, ‘हे सर्व पाहणे वाईट होते, ज्याप्रमाणे ही गोष्ट मोठी झाली. त्यातून कोणालाही जावेसे वाटणार नाही. कारण मी वॉर्नरला ओळखतो आणि तसेच मी स्मिथलाही ओळखतो.’
‘मैदानातील स्पर्धा सोडली तर या दोन खेळाडूंबरोबर जे झाले, ते पाहून मला वाईट वाटले. मला वाटते की त्या प्रकरणानंतर ज्या गोष्टी झाल्या, त्या व्हायला नको होत्या.’
मार्चमध्ये केपटाउन कसोटीत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर वॉर्नर आणि स्मिथला आॅस्ट्रेलियाला पाठवत असताना ज्याप्रकारे सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना नेले होते, ते दृश्य पाहुन खूप वाईट वाटल्याचेही विराटने सांगितले.
विराट म्हणाला, ‘ त्यांच्याबद्दल जो निर्णय घेतला त्याबद्दल मत मांडू शकत नाही, कारण ते योग्य नाही. पण लोकं ज्याप्रकारे वागले ते पाहणे आनंददायी नव्हते. क्रिकेटपटू म्हणून मला कधीही असा अनुभव घ्यायला आवडणार नाही.’
या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांनाही पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली होती. या प्रकरणाबद्दल स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने 1 वर्षांची तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्याची बंदी घातली आहे.
या प्रकरणानंतर विराटने स्मिथ आणि वॉर्नरला संपर्क साधला आहे का, असे विचारल्यावर विराट म्हणाला, ‘त्याचवेळी नाही. पण त्या प्रकरणानंतर आणि आधीही मी नेहमी वॉर्नरच्या संपर्कात असतो. आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी त्याच्या संपर्कात नेहमी असतो. तो मला सामन्यानंतर संदेश पाठवत असतो.’
‘कदाचीत मैदानावर जे घडले, त्यानंतर दरी कमी करण्यासाठी दोघांचीही गरज असते, त्यामुळे मी त्याचे स्वागतच करेल आणि त्याच्याशी पहिल्यासारखेच चांगले संबंध ठेवेल.’
2017 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रेलिया संघातील खेळाडूंशी विराटचे वाद झाले होते. तसेच या दौऱ्यातील स्मिथचे ड्रेसिंग रुमकडे पाहून डीआरएस घेण्याचे प्रकरणही बरेच चर्चेत होते. पण ते सर्व मैदानावरील गोष्टी होत्या. पण याचा परिणाम विराट आणि वॉर्नर यांच्या मैत्रीवर झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम
–या कारणामुळे चेतेश्वर पुजारा आहे टीम इंडियासाठी लकी
–अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास