रांची। शुक्रवारी(8 मार्च) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 32 धावांनी विजय मिळवला. हा ऑस्ट्रेलियाचा 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला विजय होता.
या सामन्यात भारताला पराभूत जरी व्हावे लागले असले तरी भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी हा सामना खास ठरला आहे. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने 95 चेंडूत 123 धावांची खेळी करताना 16 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेमधील 41 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 66 वे शतक आहे.
विराट मागील दोन वर्षांपासून तुफान लयीत असून तो बऱ्याचदा अर्धशतकाचे रुपांतर शतकी खेळीत करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने 2017 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 शतके केली आहेत. जी पाकिस्तान संघाने मिळून केलेल्या शतकांपेक्षाही जास्त आहेत. पाकिस्तानने 2017 पासून 24 शतके केली आहेत.
तसेच विराटने वनडेमध्ये जानेवारी 2017 पासून 15 शतके केली आहेत. ही शतके करताना त्याने पाकिस्तान, विंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका सारख्या देशांनाही मागे टाकले आहेत.
त्याचबरोबर वनडेमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने मिळून 2017 पासून एकट्या विराट एवढी 15 शतके केली आहेत. तर त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानने 14, बांगलादेशने 13, विंडिजने 12 आणि श्रीलंका संघाने 10 शतके केली आहेत.
१ जानेवारी २०१७ पासून वनडे शतकं-
१५- विराट कोहली
१५- दक्षिण आफ्रिका
१४- पाकिस्तान
१३- बांगलादेश
१२- विंडीज
१०- श्रीलंका१ जानेवारी २०१७पासून आंतरराष्ट्रीय शतकं-
२५- विराट कोहली
२४- पाकिस्तान#म #मराठी #ViratKohli #MSDhoni #Ranchi #IndvAus— Sharad Bodage (@SharadBodage) March 8, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनी पाठोपाठ हा खेळाडूही मोहाली वनडेतून बाहेर
–पाकिस्तान म्हणतंय, आर्मीची टोपी घालून खेळणाऱ्या भारतीय संघावर कारवाई करा
–कर्णधाराच्या त्या अट्टहासामुळे गोलंदाजाचा विश्वविक्रम हुकला?