राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा आयपीएल 2023 चा 56 वा सामना 9 विकेट्सने जिंकला. या विजयासह राजस्थानने हंगामातील सहावा विजय मिळवत गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले. यशस्वी जयस्वाल याच्या 98 धावांच्या खेळीचा यामध्ये मोठा वाटा राहिला. त्याच्या या शानदार खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने देखील इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्याचे गुणगान गायले.
विजयासाठी मिळालेल्या 150 धावांचा पाठलाग करताना अगदी पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वाल केकेआरच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याचे शतक 2 धावांनी हुकले. त्याने 47 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावा केल्या. त्याने यावेळी 13.1 षटकात संघाला शानदार विजय मिळवून दिला. या लाजवाब खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याच्या खेळीच्या सुरुवातीलाच विराट कोहली याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली.
https://twitter.com/KohliFanVerse/status/1656866157511729152?t=FlF-bQDpjm7EvmQrnEbnTg&s=19
‘वाह. नजीकच्या काळात मी पाहिलेल्या सर्वोत्तम फलंदाजीपैकी एक खेळी. यशस्वी जयस्वाल. काय प्रतिभा आहे’
जयस्वाल याने दोन वर्षांपूर्वी विराट कोहली सोबत झालेल्या भेटीचे एक छायाचित्र इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्यावेळी त्याने विराट आपल्या आदर्श असल्याचे म्हटलेले. त्यानंतर आता विराटने या युवा खेळाडूचे कौतुक केल्याने हे त्याच्यासाठी रिटर्न गिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे.
जयस्वाल याची ही खेळी अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याने नितिश राणाने टाकलेल्या पहिल्या षटकात तब्बल 26 धावा वसूल केल्या होत्या. यामध्ये पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचलेले. त्यानंतर त्याने केवळ 13 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण करत आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली.
(Virat Kohli Instagram Story Praised Yashasvi Jaiswal For His Fine Knock Against KKR)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंच्या आंदोलनाची धग बीसीसीआयपर्यंत! ‘या’ प्रकरणात मिळाली नोटीस, वाचा सविस्तर
धोनी-रैनाच्या विक्रमाचा पाठलाग करतोय यशस्वी! केकेआरला चोपत जडेजाला सोडले मागे