भारतीय कर्णधार विराट कोहली आता श्रीलंकेतील कसोटीच्या निर्भेळ यशानंतर एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयन्त करेल. या मालिकेतील पहिला सामना २० ऑगस्ट रोजी डांबुलाच्या मैदानावर खेळला जाणार आहे.
२००८ मध्ये भारताच्या या स्टार फलंदाजाने डंबुलाच्या याच मैदानावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता. या रविवारी भारत पुन्हा याच मैदानावर खेळणार आहे. २००८ च्या त्या सामान्य आधी भारतीय संघ ज्या ड्रेससिंग रूममध्ये होता तेथे विराट ज्या खुर्चीवर बसला होता, त्याच खुर्चीवर बसून विराटने पुन्हा एक फोटो काढला आहे. बीसीसीआय ने हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेयर देखील केला आहे.
तब्ब्ल ९ वर्षानंतर विराट पुन्हा त्या खुर्चीवर बसला आहे. मागील ९ वर्षात विराटने क्रिकेट जगात वर्चस्व प्राप्त केले आहे. ९ वर्षांपूर्वी जो विराट एक १८ वर्षाचा युवा खेळाडू म्हणून या खुर्चीवर बसला होता, आता तो विराट भारतीय क्रिकेट संघाचं तिन्ही प्रकारात नेतृत्व करतो.
विराट कोहलीचे श्रीलंकेबरोबर एक अतूट नाते आहे हे तर आपल्या सर्वांना माहित असेलच. म्हणजे श्रीलंकेत २००८ मध्ये आपला पहिला सामना खेळणे असो वा मलिंगाच्या यॉर्कर्सवर षटकार मारणे असो. विराटसाठी नेहमीच श्रीलंका स्पेशल राहिली आहे.
विराटने एकदिवसीय पदार्पणानंतर जागतिक क्रिकेटमध्ये सार्वधिक चेंडू (९०६७), सर्वाधिक धावा(८२५७), सर्वाधिक शतके (२८), सर्वाधिक ५०+ धावा (७१) केल्या आहेत.
Few things never change – only the legend grows. #ThisDayThatYear In 2008, @imVkohli sat on this very chair during his debut game #SLvIND pic.twitter.com/0LCwQKZQ1i
— BCCI (@BCCI) August 18, 2017