डफ एंड फेल्प्सने 2020 मधील भारतातील सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिग्गजांना पछाडत सलग चौथ्या वर्षीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. विशेष म्हणजे विराट व इतर सेलिब्रिटीमधील अंतर हे कमालीचे मोठे आहे.
विराटची ब्रँड व्हॅल्यू तब्बल 1733 कोटी रुपये इतकी आहे. विराट पहिल्या दहामध्ये समाविष्ट असणारा एकमेव खेळाडू असून, इतर सर्व 9 लोक हे फिल्मस्टार्स आहेत. पहिल्या 10 व्यक्तींमध्ये 2 महिला अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.
विराटनंतर अक्षय कुमार 867 कोटी रुपयांसह दुसऱ्या व रणवीर सिंग 750 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे विराट व अक्षय मधील फरक तब्बल 866 कोटी रुपयांचा आहे. रणवीरने सलग दुसऱ्या वर्षी तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
या यादीत बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खान 372 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच दीपिका पादुकोण (367 कोटी )व आलिया भट (349 कोटी ) अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अशा सहा गोष्टी ज्यांच्यावर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान असेल सर्वांचेच लक्ष
बाबो.. ही कसली स्टाईल! टी१० लीगमधील खेळाडूची गोलंदाजी खूपच विचित्र, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
‘तुम्ही घर चालवण्यासाठी खोट्याची साथ देता’, ‘त्या’ ट्वीटमुळे घेतला जातोय रहाणेचा समाचार