हैद्राबाद। भारताने शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 6 विकेट्स विजय मिळवत पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील सामना 5 मार्चला नागपूर येथे विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघ आज(3 मार्च) नागपूरला रवाना झाला आहे. यावेळी विराट कोहलीने मोहम्मद शमीबरोबरचा हैद्राबाद विमानतळावरील फोटो ट्विटरला शेअर केला आहे. तसेच त्याने ‘लीन मीन पेस मशिन'(सडपातळ वेगवान मशिन) असे टोपणनाव शमीला दिले आहे.
Nagpur next. ✈️ With the lean mean pace machine @MdShami11 🤜🤛 pic.twitter.com/LoQP1OtKYd
— Virat Kohli (@imVkohli) March 3, 2019
यानंतर लगेचच काही वेळात हाच फोटो शमीनेही ट्विटरवर शेअर करत विराटला ‘रेकॉर्ड मशिन’ असे म्हटले आहे.
Departure to Nagpur with record machine @imVkohli pic.twitter.com/ivUimqQ9Va
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) March 3, 2019
विराट हा आजकाल जेव्हाही मैदानावर उतरतो तेव्हा काहीतरी विक्रम करतोच त्यामुळे शमीने विराटला ‘रेकॉर्ड मशीन’ हे नाव दिले असावे. तर शमीने मागील काही महिन्यात जवळजवळ 6 ते 7 किलो वजन कमी केले आहे, त्यामुळे विराटने शमीला ‘लीन मीन पेस मशिन’ असे नाव दिले असावे.
शमी घेत असलेल्या मेहनतीबद्दल विराटने पहिल्या वनडे सामन्यानंतर कौतुकही केले होते. विराट म्हणाला, ‘मी त्याला(शमी) याआधी इतके सडपातळ कधीही पाहिले नाही. त्याने या सामन्यात चांगल्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. याआधी मी त्याला विकेटसाठी इतके आतुर कधीही पाहिले नव्हते. विश्वचषक जवळ येत असल्याने ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे.’
शमीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडेमध्ये 10 षटकात 42 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मॅक्सवेल आणि ऍश्टन टर्नरला बाद केले. शमीने 2019 मध्ये आत्तापर्यंत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या केदार-धोनी जोडीने केला हा मोठा पराक्रम
–आयपीएल फॅन्स!!! मुंबई इंडियन्सची नवी जर्सी पाहिली का?
–टॉप १०: पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी केले हे खास विक्रम