मुंबई। आजपासून(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठा विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
त्याने जर या मालिकेत किमान एक शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकेल.
सध्या कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम पाँटिंग आणि विराटच्या नावावर संयुक्तरित्या आहे. विराटने 169 सामन्यात 41 शतके केली आहेत. तर पाँटिंगने 324 सामन्यात 41 शतके केली आहेत. त्यामुळे आता विराटला या यादीत पाँटिंगला मागे टाकण्याची संधी आहे.
एवढेच नाही तर विराटने जर या मालिकेत शतक केले तर तो वनडेमध्येही कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत पाँटिंगची बरोबरी करेल.
सध्या वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने 230 वनडेत कर्णधार म्हणून 22 शतके केली आहेत. पाँटिंगच्या पाठोपाठ या यादीत विराट आहे. विराटने कर्णधार म्हणून 83 वनडेत 21 शतके केली आहेत.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
41 शतके – रिकी पाँटिंग (324 सामने)
41 शतके – विराट कोहली (169 सामने)
33 शतके – ग्रॅमी स्मिथ (286 सामने)
20 शतके – स्टिव्ह स्मिथ (93 सामने)
19 शतके – मायकल क्लार्क (139 सामने)
19 शतके – ब्रायन लारा (172 सामनेे)
#वनडेत सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
22 शतके – रिकी पाँटिंग (230 सामने)
21 शतके – विराट कोहली (83 सामने)
13 शतके – एबी डिविलियर्स (103 सामने)
11 शतके – सौरव गांगुली (147 सामने)
10 शतके – सनथ जयसुर्या (118 सामने)
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका हा संघ जिंकणार, रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी
वाचा👉https://t.co/UFiPwoHE2U👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
निवृत्तीतून माघार घेतलेला हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर करतोय पुनरागमन https://t.co/t9vFmdHNjB#म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020