हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 237 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन शून्य धावेवरच बाद झाला.
पण त्यानंतर रोहित शर्मा(37) आणि विराट कोहलीेने(44) डाव सांभाळला. परंतू खेळपट्टीवर स्थिर झाल्यानंतर हे दोघेही बाद झाले. त्यापाठोपाठ अंबाती रायडूही(13) लगेचच बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 4 बाद 99 धावा अशी झाली.
परंतू यानंतर भारताचा डाव केदार जाधव आणि एमएस धोनीने सांभाळताना एकही विकेट जाऊ दिली नाही. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
त्यामुळे वरची फळी लवकर बाद झाल्यानंतरही भारताच्या मधल्या फळीने उचलल्या जबाबदारीचे भारताचा कर्णधार विराटने कौतुक केले आहे.
विराट सामन्यानंतर म्हणाला, ’99 धावांवर 3 बाद असताना(भारताची स्थिती 4 बाद 99 अशी होती) मी रवी शास्त्रींना म्हणालो, ही चांगली गोष्ट आहे. आता यांना (केदार, धोनी) भारताला जिंकून दाखवावं लागेल. ज्याप्रकारे धोनी आणि केदारने जबाबदारी घेतली, ते पहाणे चांगले होते.’
तसेच विराट म्हणाला, ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. एमएस धोनीकडे अनुभव आहे आणि केदारकडेही आता बराच अनुभव आहे. त्यांची भागीदारी उत्कृष्ट होती. त्यांची चांगली कामगिरी झाली.’
या सामन्यात धोनीने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 59 धावा केल्या. तर केदारने 87 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत केदारने 9 चौकार आणि 1 षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीचा नवीन कारनामा, आता हा विश्वविक्रमही झाला नावावर
–अनेक वर्षांनी विराट कोहलीच्या बाबतीत घडली अशी घटना…
–विराटबरोबर २००८च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा