सध्या टी20 क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. दरम्यान चाहत्यांना असे खेळाडू जास्त आवडतात जे जलद गतीने धावा काढण्यात तज्ज्ञ असतात. सुरूवातीपासूनच भारतीय फलंदाज टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवत आहेत. याचे श्रेय आयपीएललाही जाते. टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे.
1) विराट कोहली- विराट कोहली (Virat Kohli) हा टी20 मध्ये सर्वात कमी डावांमध्ये 2,500 धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने त्याच्या 68व्या डावात हा आकडा गाठला. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात कमी डावांमध्ये 2,500 धावा करण्याच्या बाबतीत कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने 125 सामन्यात 48.69च्या सरासरीने 4,188 धावा केल्या. दरम्यान त्याने 38 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले.
2) सूर्यकुमार यादव- भारताचा टी20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakmar Yadav) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 2,500 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याने 71 डाव खेळले. 34 वर्षीय सूर्यकुमारने त्याच्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 83 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 38.20च्या सरासरीने 2,598 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 4 शतकांसह 21 अर्धशतके झळकावली आहेत.
3) रोहित शर्मा- रोहित शर्माला (Rohit Sharma) सर्व क्रिकेट चाहते ‘हिटमॅन’ म्हणून ओळखतात. उजव्या हाताच्या या अनुभवी फलंदाजाने 2,500 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 92 डाव घेतले. रोहितने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या त्याच्या 100व्या टी20 सामन्यात ही कामगिरी केली. रोहितने गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने आपल्या कारकिर्दीत 159 सामने खेळले आणि 32.05च्या सरासरीने 4,231 धावा केल्या. दरम्यान त्याने 5 शतकांसह 32 अर्धशतके झळकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
युनिव्हर्स बॉस पुन्हा क्रिकेट मैदानात परतणार, या टी20 स्पर्धेत खेळणार!
रोहिराट किती महिन्यांनी खेळणार वनडे सामना? शेवटच्या सामन्यात कामगिरी कशी?
IND vs ENG; रिंकू, हर्षितने नाही तर ‘या’ खेळाडूने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणांचे पदक!