मुंबई | भारतीय क्रिकेट बोर्डाने आज २०१६-१७ आणि २०१७-१८ वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठीची नावे घोषीत केली. त्यात कर्णधार विराट कोहलीला या दोन्ही वर्षांसाठीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरूष क्रिकेटपटूचा पाॅली उम्रीगर पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा २०१६-१७ आणि २०१७-१८चा पुरस्कार अनुक्रमे हरमनप्रीत कौर आणि स्म्रीती मंधनाला देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा १२ जून रोजी बेंगलोर शहरात होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना १५ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. तसेच ९ पुरस्कार्थींच्या मानधनात यावेळी १ लाखावरुन वाढ करुन ती आता १.५ लाख करण्यात आली आहे.
२०१६-२०१७ वर्षासाठी बीसीसीआयचे पुरस्कार
कर्नल सीके नायडू जिवनगौरव पुरस्कार- दिवंगत पंकज राॅय
बीसीसीआय जिवनगौरव पुरस्कार (महीला)- डायना इल्जी (पुरस्कार नाकारला)
बीसीसीआय स्पेशल अॅवार्ड- अब्बास अली बेग आणि दिवंगत नरेन ताम्हाणे
पाॅली उम्रीगर पुरस्कार- विराट कोहली
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महीला क्रिकेटपटू- हरमनप्रीत कौर
लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (रणजी)- परवेज रसुल
लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये)- कृणाल पंड्या
माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू- प्रियांक पांचाल
माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज- शाहबाद नदीम
जगमोहन दालमिया ट्राॅफी (देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी महिला क्रिकेटर)- पुनम राऊत
सर्वाोत्तम पंच (देशांतर्गत क्रिकेट)- अनिल धांडेकर
यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ- बंगाल
२०१७-२०१८ वर्षासाठी बीसीसीआयचे पुरस्कार
कर्नल सीके नायडू जिवनगौरव पुरस्कार- अंशुमन गायकवाड
बीसीसीआय जिवनगौरव पुरस्कार (महीला)- सुधा शाह
बीसीसीआय स्पेशल अॅवार्ड- बुधी कुंदेरन
पाॅली उम्रीगर पुरस्कार- विराट कोहली
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महीला क्रिकेटपटू- स्म्रिती मानधना
लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (रणजी)- जलाज सक्सेना
लाला अमरनाथ अष्टपैलू खेळाडू (देशांतर्गत क्रिकेटमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये)- दिवेश पठाणी
माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू- मयांक अग्रवाल
माधवराव सिंधीया रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज- जलाज सक्सेना
जगमोहन दालमिया ट्राॅफी (देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी महिला क्रिकेटर)- दिप्ती शर्मा
सर्वाोत्तम पंच (देशांतर्गत क्रिकेट)- य़शवंत बर्डे
यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ- दिल्ली