भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ‘World’s Highest Paid Athletes 2018’ फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेट खेळाडू ठरला आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली २४ मिलियन अमेरिकन डाॅलर वार्षिक कमाईसह ८३ व्या क्रमांकावर आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे यात एकाही महिला ऍथलिट खेळाडूचा समावेश नाही.
या यादीत नाव असणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराटने यावर्षी ४ मिलियन अमेरिकन डाॅलर पगार आणि विजेतेपदामधून तर २० मिलियन अमेरिकन डाॅलर जाहिरातीमधून कमावले आहेत. प्रथम स्थानी असलेल्या फ्लॉयड मेयवेदरची कमाई विराटपेक्षा चारपटीपेक्षाही खुप जास्त आहे.
११ विविध खेळांमधील खेळाडूंचा समावेश फोर्ब्सच्या १०० जणांच्या यादीत करण्यात आला आहे. एनबीए लीगमधील तब्बल ४० बास्केटबॉल खेळाडूंचा समावेश आहे तर गेल्यावर्षी हा आकडा ३२ इतका होता.
41 वर्षीय अमेरिकन बॉक्सर फ्लॉयड मेयवेदर २८५ मिलियन अमेरिकन डाॅलरसह पहिल्या स्थानावर आहे. नॅशनल फुटबॉल लीग मधील १८ खेळाडूंचा समावेश आहे. त्यातील मॅट रेयान ६७.३ मिलियन अमेरिकन डाॅलर कमाईसह नवव्या स्थानावर आहे.
फोर्ब्सच्या म्हणन्यानुसार एकही महिला खेळाडू १०० जणांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाही. कारण ली ना २०१४ साली निवृत्त झाली. शारापोव्हाने प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याने तिला १५ महिन्यांच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
सेरेनाने प्रेग्नेंसीमुळे काही काळासाठी ब्रेक घेतला होता. सप्टेंबरमध्ये तिने अलेक्सीस नावाच्या मुलीला जन्म दिला. ८ मिलियन अमेरिकन डाॅलरवरून ६२००० अमेरिकन डाॅलर पर्यंत तिच्या कमाईत घट झाली आहे. सेरेनाला मागच्या वर्षी या यादीत स्थान होते.