भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा सध्या विश्वचषकात शानदार कामगिरी करताना दिसतोय. लवकरच विराट आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपल्या पंधरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दित अनेक विश्वविक्रम नावे करणाऱ्या विराटने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या आजवरच्या कारकिर्दीबाबत अनेक मोठी विधाने केली.
या विश्वचषकात सर्वांना वेध लागले आहेत ते विराट आपले 50 वनडे शतक पूर्ण करणार का याचे. याच गोष्टीची चर्चा असताना त्याने एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“मी कठोर परिश्रम करतो. नेहमी खूप शिस्त पाळतो आणि माझे लक्ष खेळाकडे ठेवतो. त्यानंतर मला खेळानेच निकाल दिले. माझ्या कारकिर्दीत मी शिकलो आहे की, खेळात प्रयत्नांना नेहमी यश मिळते. मी इतक्या धावा आणि शतके करेन असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या संघाला कसे जिंकवावे, माझे 100% द्यायचे आणि कठीण परिस्थितीतून संघाला विजय कसा मिळवून द्यायचा याचे स्वप्न नेहमीच पाहत होते.”
विराट कोहली या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने सहा सामने खेळताना आत्तापर्यंत तीन अर्धशतके व एक शतक झळकावलेय. या सामन्यात त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा साखळी फेरीतील आठवा सामना 5 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. सध्या हे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. हा सामना विराट कोहली याच्यासाठी खास असेल. कारण विराट या दिवशी आपला वाढदिवस साजरा करत आहे.
(Virat Kohli Speaks About His Career And Centuries)
हेही वाचा-
भारताच्या माजी खेळाडूने गायले शाहीन आफ्रिदीचे गुणगान, इतर गोलंदाजांविषयी म्हणाला…
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल