सध्या भारतीय क्रिकेट संघात सगळ्यात जास्त तंदुरूस्त खेळाडू कोण असेल तर तो आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे.
फिट राहण्यासाठी तो खूप वेळ जिममध्ये घालवतो का? तर नाही.
विराट फिट राहण्यासाठी कमी वेळात सर्वोच्च क्षमतेने जिममध्ये सराव करतो. म्हणूनच त्याचे संघ सहकारी त्याच्याकडून प्रेरणा घेऊन फिट राहण्याकडे अधिक लक्ष देत आहे.
यात तो जास्त मोठ्या प्रमाणात वजन उचलतो. तसेच कंपाऊंड वर्कआऊट्स आणि सर्वोच्च क्षमतेची कार्डिओ ट्रेनिंग असा व्यायाम करतो.
विराटच्या आधी काहीच खेळाडू अधिक फिट होते. यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र आता फक्त असे थोडेच खेळाडू आहे जे मध्यम स्तरावर फिट आहे. यात गोलंदाजाचा समावेश आहे.
फिटनेसच्या सरावाबरोबरच विराट त्याच्या आहाराची पण विशेष काळजी घेतो. तसेच तो त्याचा सारखा डाएट संघातील बाकीच्या खेळाडूंनाही घ्यायला सांगतो.
अलिकडेच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एमएस धोनी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते.
त्याच्या या फिटनेसबद्दल अधिक माहिती देताना तो म्हणाला,”मी 145 किलोचे डेडलिफ्ट उचलले आहे. तसेच मी 1 तासात 14 किमी वेगाने असा 20 मिनीटे पळालो आहे. रोजचा डाएट सोडून मला मल्टीग्रेन चिप्स खायला आवडतील.”
विराट सध्या मानेच्या दुखापतीतून सावरत आहे. याच दुखापतीमुळे त्याला काऊंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. इंग्लंड दौऱ्यासाठी सराव व्हावा म्हणून तो सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळणार होता.