नागपूर। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुरक्षेची चिंता न करता त्याच्या एका अपंग चाहत्याला भेटून आनंद दिला आहे. या बद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विराट मैदानावर जसा त्याच्या फलंदाजीने राज्य करतो तसाच तो त्याच्या चाहत्यांच्या मनावरही करतो असेच यातून दिसून आले.
विराटचा चाहता वर्ग मोठा आहे आणि विराटही त्यांना नाराज करत नाही. या व्हिडीओमध्ये विराट या चाहत्याला भेटला आणि त्याच्याबरोबर काही क्षण बोलून त्याने त्याच्यासोबत फोटो काढले. हा व्हिडीओ कोलकातामध्ये झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या कसोटीच्या दरम्यानचा असल्याचे दिसून येत आहे.
विराटची ही कृती चाहत्यांना काही पहिल्यांदा पाहायला मिळालेली नाही. याआधीही अनेकदा विराटने असे चाहत्यांना खुश केले आहे. मागच्या वेळीही भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या मालिकेदरम्यान विराट विमानतळावर कशाचीही पर्वा न करता व्हीलचेअरवरील लहान मुलांना भेटला होता.
https://www.instagram.com/p/BbubYnPAKw1/
यावेळी त्याला या लहान मुलांनी हाताने बनवलेली काही चित्रे भेट दिली होती. तर विराटने त्यांना स्वाक्षरी देऊन सेल्फी काढली होती. याबद्दलचा व्हिडीओही वायरल झाला होता.
@imVkohli King on and off the field👑 pic.twitter.com/8eycrXgYfE
— Nav (@ImNsamy) November 8, 2017
सध्या विराट भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. २४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरला दुसरा कसोटी सामना नागपूरला होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.