सध्या आयपीएल 2025 स्पर्धेचं संपूर्ण देशात वारे वाहत आहे. आज म्हणजेच 3 मे शनिवार रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आरसीबी संघात महासामना होणार आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर राहतील. ज्याने या संपूर्ण हंगामात शानदार प्रदर्शन केलं आहे. चेन्नई विरुद्ध जेव्हा विराट चेपॉकच्या मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरेल,तेव्हा त्याच्या निशाण्यावर एक मोठा विक्रम आहे. आज 51 धावा पूर्ण केल्यानंतर तो डेव्हिड वॉर्नरचा विक्रम उध्वस्त करू शकतो.
विराट कोहली आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वात जास्त धावा करण्याच्या विक्रमात डेव्हिड वॉर्नरच्या पुढे जाईल. सध्या सर्वात जास्त धावांचा विक्रम डेविड वॉर्नरच्या नावावर आहे, ज्याने पंजाब किंग्स विरुद्ध 26 सामन्यात 1134 धावा आहेत. तसेच विराटने चेन्नई विरुद्ध 34 सामन्यांमध्ये 37.37 च्या सरासरीने आणि 125.46 च्या स्ट्राइक रेटने 1084 धावा आत्तापर्यंत केल्या आहेत, ज्यामध्ये 9 अर्धशतके समाविष्ट आहेत. यादरम्यान त्याची सर्वश्रेष्ठ खेळी नाबाद 90 धावांची आहे. जर आज विराटने 51 धावा केल्या तर तो वर्नरचा हा महाविक्रम मोडू शकतो.
आयपीएल मध्ये एका संघाविरुद्ध सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू
डेव्हिड वॉर्नर 1034 धावा विरुद्ध (पंजाब किंग्स)
विराट कोहली 1130 धावा विरुद्ध (दिल्ली कॅपिटल्स)
विराट कोहली 1104 धावा विरुद्ध (पंजाब किंग्स)
डेव्हिड वॉर्नर 1093 धावा विरुद्ध (कोलकाता नाईट रायडर्स)
विराट कोहली 1084 धावा विरुद्ध (चेन्नई सुपर किंग्स)
रोहित शर्मा 1083 धावा विरुद्ध (कोलकाता नाईट रायडर्स)
आयपीएल स्पर्धेत शानदार पद्धतीने विराट कोहली धावा करत आहे. विराटने आत्तापर्यंत दोन वेळा एका संघाविरुद्ध 1100 धावा केल्या आहेत. त्याने हा कारनामा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध केला आहे. तसेच आता तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सुद्धा 1100 धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला फक्त 16 धावांची गरज आहे.
आयपीएल 2025 मध्ये विराट कोहलीने 10 सामन्यात 63.29 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पाचव्या स्थानावर आहे. कोहलीने 39 चौकार आणि 13 षटकार झळकावले आहेत. तर या हंगामात आरसीबीसाठी धावा करणारा टॉप फलंदाज आहे.