दिल्ली क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (25 जुलै) त्रिसदस्सीय क्रिकेट समिती स्थापना केली आहे. या समितीमध्ये भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागचा समावेश करण्यात आला आहे.
त्याच्या बरोबरच या समितीमध्ये भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि राहुल सांगवी यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर या समितीचा विशेष आमंत्रित असेल.
या समितीबद्दल दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “राज्य संघटनांसाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशीनुसार आणि बीसीसीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही क्रिकेट समिती विविध निवड समित्या तयार करण्यासाठी अधिकृत आहे. तसेच ही समिती दिल्लीतील क्रिकेटच्या सुधारणेसाठी संघटनेला मौल्यवान मार्गदर्शन करेल.”
सेहवाग भारताकडून 104 कसोटी सामने आणि 251 वनडे सामने खेळले असून या दोन क्रिकेट प्रकारात मिळून 16000 पेक्षा जास्त धावा केल्या आहे. तो सध्या समालोचक म्हणून तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबचा मार्गदर्शक म्हणून काम करतो.
तसेच आकाश चोप्राही भारताकडून 10 कसोटी सामने खेळला असून तोही सध्या समालोन करतो. तर राहुल सांगवी मुंबई इंडिसन्सचा संघ व्यवस्थापक आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–युवा खेळाडू पवन शहाने हा विक्रम करत गंभीर, पुजारालाही टाकले मागे
–केवळ काही तासांच्या फरकाने भारतीय संघ खेळणार दोन वनडे सामने
–कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतो तब्बल ८० लाख रुपये तर ख्रिस्तीयानो रोनाल्डो…