भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मजेशीर ट्विट आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अशातच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक जुने ट्विट शेअर केले आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनून आहे.
सेहवागने आधी एक ट्विट शेअर केले होते, ज्यामध्ये त्याने जुलै महिन्यात जन्म घेतलेल्या दिग्गज भारतीय कर्णधारांचा उल्लेख केला होता. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “७ जुलै- महेंद्र सिंग धोनीचा, ८ जुलै-सौरव गांगुली, १० जुलै-सुनील गावसकर. ९ जुलैचे अजून कोणी आले नाही. कदाचित भारतीय संघाचा भावी कर्णधार या दिवशी जन्म घेणार असेल किंवा कुठेतरी आपला वाढदिवस साजरा करत असेल.”
त्याने पुढे हॅशटॅगमध्ये लिहिले होते की, “जुलै महिन्यात जन्म घ्या आणि भारतीय संघाचे कर्णधार व्हा.” आता धोनी, गांगुली यांचा वाढदिवस पार पडल्यानंतर गावसकरांच्या वाढदिवसापुर्वी पुन्हा त्याने आपले जुने ट्वीट शेअर केले आहे.
त्याने आपल्या ट्विटमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जुलै महिन्यात जन्म घेतलेले क्रिकेटपटू भारतीय संघाचे कर्णधार झाले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी, सौरव गांगुली आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे. या तीनही कर्णधारांनी, भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धा, २०११ विश्वचषक स्पर्धा आणि चॅम्पियन ट्रॉफी २०१३ स्पर्धेत विजय मिळवला होता. तसेच सौरव गांगुली देखील भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहेत.(Virender Sehwag old tweet went viral on social media)
https://www.facebook.com/130561483625985/posts/4881759331839486/?app=fbl
वीरेंद्र सेहवागची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारतीय संघासाठी सलामी फलंदाजी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सेहवागने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण १०४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ८५८६ धावा केल्या आहेत. यामध्ये २३ शतक आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २५१ वनडे सामन्यात त्याने १५ शतक आणि ३८ अर्धशतकांसह ८२७३ धावा केल्या आहेत. तसेच १९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यात युजवेंद्र चहलची अग्निपरिक्षा; पाहा या दौऱ्याबद्दल काय म्हणाला भारतीय फिरकीपटू
हरलीन देओलने ‘सुपरवुमेन’ बनत बाउंड्रीजवळ टिपला अद्भुत झेल; चाहते म्हणाले, ‘हुबेहुब जडेजा’
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा