---Advertisement---

शार्दुल ठाकूरनंतर दिग्गज गोलंदाज अडकला लग्नबंधनात, आरसीबी भलतीच टेंशनमध्ये, जाणून घ्या कारण

RCB
---Advertisement---

आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा महत्वाचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगा याने गुरुवारी (9 मार्च) आयुष्यातील नवीन इनिंगची सुरुवात केली. त्याची प्रेयसी विंदिया हिच्यासोबत हसरंकाने लग्न केले असून तिच्यासोबता एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोत या दोघांची जोडी सुंदर दिसत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) याचा मित्र दनुष्का सेनादीरा या नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर केला आहे. हसरंगा यावेळी श्रीलंकेत आहे लवकरच न्यूझीलंडसाठी रवाना होईल. दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका संघ या मालिकांसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. गुरुवारी (9 मार्च) उभय संघांतील कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने 6 बाद 306 धावा केल्या.

https://www.instagram.com/p/CpjgKCMLmpz/?utm_source=ig_web_copy_link

नवीन लग्न झाल्यानंतर वानिंदू हसरंगाला शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली आहे. हसरंगा सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो पण, लग्नानंतर काही वेळातच त्याने पत्नीसोबतचा फोटो चाहत्यांसाठी शेअर केला. लग्नाआधी हसरंगाने कधीही मोकळेपणाने काही माहिती दिली नव्हती. न्यूझीलंड संघाविरुद्धच्या वनडे मालिकेआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला लग्नासाठी वेळ दिला होता. 25 मार्च रोजी पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. त्याआधी खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी हसरंगा संघाचा भाग नाहीये. पण वनडे आणि टी-20 मालिकेत तो खेळताना दिसू शकतो.

आगामी आयपीएल हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. पण वानिंदू हसरंगा या आयपीएल हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपस्थित असेल की नाही, याविषयी श्रीलंका बोर्डाने अद्याप कुठलीच ठोस माहिती दिली नाहीये. मागच्या आयपीएल हंगामात हसरंगाने धुमाकूळ घातला होता. आरसीबीसाठी खेळलेल्या 18 सामन्यांममध्ये हसरंगाने 26 विकेट्स नावावर केल्या होत्या. अशात आघामी आयपीएल हंगामातही हसरंगा आरसीबीचा प्रमुख गोलंदाज बनू शकतो.अशात जर आगामी आयपीएल हंगामतील सुरुवातीच्या सामन्यांना हा गोलंदाज मुकला, तर संघाला मोठे नुकसान होऊ शकते. श्रीलंकन संघाचा न्यूझीलंड 8 मार्च रोजी संपणार असून त्यानंतर हसरंगा आयपीएलसाठी निश्चित उपलब्ध असणार असेही सांगितले जात आहे.
(Wanindu Hasaranga got married)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबीने केली बीसीसीआयची कॉपी! पाकिस्तानमध्येही सुरू झाली महिला टी-20 लीग
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---