येत्या काही दिवसात आयपीएल २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हे हंगाम सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. दरम्यान श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदु हसरंगावर देखील मोठी बोली लावण्यात आली आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्पयात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने वनिंदु हसरंगाला (wanindu hasaranga) आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर आगामी हंगामासाठी त्याला रिलीज करण्यात आले होते. परंतु येत्या आयपीएल २०२२ स्पर्धेत तो पुन्हा एकदा संघात खेळताना दिसून येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला १० कोटी ७५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये होती.
आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला होता. या स्पर्धेत त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. या स्पर्धेत त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या :
बिग ब्रेकिंग! आयपीएल लिलावात बोली प्रक्रिया पार पाडणारे ‘ह्युज एडमिड्स’ चालू कार्यक्रमात कोसळले
पडीक्कलवर आरसीबीने बोली लावण्यातही दाखवला नाही रस, अखेर ‘या’ संघाने ७.७५ कोटींसह केले खरेदी
शिमरॉन हेटमायर झाला कोट्यधीश!! आगामी हंगामात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व