भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत मोठी कामगिरी केली. पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं सात विकेट्स घेतल्या. कसोटीत तो पहिल्यांदाच पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
वॉशिंग्टन सुंदरनं तब्बल तीन वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळवलं आहे. पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात त्यानं चमकदार कामगिरी केली. सुंदरनं सातपैकी पाच विकेट ऑफ स्टंपच्या लाईनचा उत्कृष्ट वापर करत घेतल्या. त्यानं दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात किवी फलंदाजांना टिकून राहण्याची संधीही दिली नाही.
सुंदरनं 59 धावांत सात बळी घेत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. यासह भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुंदरचं नाव जोडल्या गेलं आहे. तसेच भारतीय भूमीवर कसोटी सामन्यातील सर्व 10 विकेट उजव्या हाताच्या ऑफस्पिनर्सनं घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यातील सर्वोत्तम आकडेवारी
8/72 – एस वेंकटराघवन, दिल्ली, 1965
8/76 – ईएएस प्रसन्न, ऑकलंड, 1975
7/59 – आर अश्विन, इंदूर, 2017
7/59 – वॉशिंग्टन सुंदर, पुणे, 2024
भारतात कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात सर्व दहा बळी फिरकीपटूंनी घेतले
भारत विरुद्ध न्यूझीलंड, पुणे 2024
भारत विरुद्ध इंग्लंड, धर्मशाला 2024
भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई 1973
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 1964
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता 1956
इंग्लंड विरुद्ध भारत, कानपूर 1952
एका डावात सर्वाधिक फलंदाज क्लीन बोल्ड करणारे भारतीय खेळाडू
5 – जसुभाई पटेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कानपूर 1959
5 – बापू नाडकर्णी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रेबॉर्न 1960
5 – अनिल कुंबळे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग 1992
5 – रवींद्र जडेजा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली 2023
5 – वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध न्यूझीलंड, पुणे 2024
हेही वाचा –
पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व, आता मदार फलंदाजांवर!
गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक! पुणे कसोटीत वॉशिंग्टनची अति ‘सुंदर’ कामगिरी
पाकिस्तानात जन्म, स्कॉटलंडमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण; आता मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड!