आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. शास्त्री यांनी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले होते की, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा त्यांचा कार्यकाळ वाढवायचा नाही. शास्त्रींच्या जागी राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने शास्त्री यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
विराट कोहलीच्या कर्णधारपदावरही वसीम अक्रम याने आपले मत मांडले आहे. टी२० कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत नामिबियाविरुद्ध होता.
अक्रमने सोशल मीडियाद्वारे लिहिले की, ‘विराट कोहलीसारख्या उत्कृष्ट खेळाडूला टी२० संघाचा कर्णधार म्हणून निरोप घेताना शुभेच्छा. टी२० कर्णधारपदाच्या शेवटच्या दिवशी, आम्ही त्याचे नेतृत्व पुन्हा पाहिले जेव्हा त्याने सूर्यकुमार यादवला नामिबियाविरुद्धचा सामना संपवण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले, हे काम तो स्वतः करू शकला असता. सामन्यात चांगली कामगिरी केल्यामुळे नामिबियाचेही अभिनंदन. पण माझे मन माझे मित्र रवी शास्त्री यांच्यासोबत आहे. वेल्डन, कमेंट्री बॉक्समध्ये परत ये मित्रा.’
अक्रमने नंतर एका कार्यक्रमादरम्यान शास्त्री यांच्या चार वर्षांच्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. शास्त्रींना कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यासाठी दरवाजे खुले असल्याचेही वसीम अक्रमने सांगितले. पण, शास्त्री नवीन आयपीएल संघ अहमदाबाद फ्रँचायझीसोबत काम करू शकतात, असे वृत्त आहे.
तो म्हणाला, ‘माझा चांगला मित्र, रवी. प्रशिक्षक म्हणून ही तुझी शेवटची स्पर्धा होती आणि मला वाटते की तू गेल्या तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. तू तुझी जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळली आहे, अभिनंदन मित्रा’
रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर रोहित शर्मा आता टी२० संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. केएल राहुल उपकर्णधार म्हणून भारतीय टी२० संघाची जबाबदारी सांभाळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत रविंद्र जडेजाचे मोठे विधान, म्हणाला…
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दाखवली ‘नृत्यकला’, तिच्या डान्स स्टेप्स पाहून व्हाल घायाळ, पाहा व्हिडिओ