आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (13th IPL Season) असणार आहे. या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) नवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अनुभवी फलंदाज वसीम जाफरची (Wasim Jaffer) नियुक्ती करण्यात आली आहे.
पंजाबने त्यांच्या नियुक्ती संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, ‘फलंदाजी प्रशिक्षक’ (Batting Coach) म्हणून त्याचे कामाचे स्वरुप पंजाबच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहे.
जाफरने नुकताच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) क्रिकेटमध्ये आपला 150वा सामना खेळला. 150 रणजी सामने खेळणारा जाफर हा पहिला खेळाडू ठरला आहे. विदर्भाकडून खेळताना जाफरने आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे हा 150 वा रणजी सामना खेळला.
41 वर्षीय जाफरने 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले असले तरी आयपीएलमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. 2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) केवळ 8 सामने खेळले होते. त्यात त्याने 107.44 च्या स्ट्राईक रेटने त्याने 16.25च्या सरासरीने 130 धावा केल्या होत्या.
2020 आयपीएलसाठी पंजाबच्या सपोर्ट स्टाफमध्ये माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) मुख्य प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) महान क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असणार आहेत.
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
हा भारतीय खेळाडू करणार किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व
वाचा👉https://t.co/rZPRQk71I5👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019