भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1 -1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ऑस्ट्रेलियन संघाला आनंदाची बातमी मिळाली असून, त्यांचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी खेळाडू वसीम जाफर यांनी ट्विटरवर मजेशीर पोस्ट करत डेव्हिड वॉर्नरला बाद करण्याचा प्लॅन भारतीय संघाला दिला आहे.
वसीम जाफर हे ट्विटरवर आपल्या विनोदी पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. अशातच त्यांनी 4 फोटो टाकत खाली लिहले आहे, “तुझ्यासाठी हा मेसेज सोपा असेल रिषभ.” जाफर यांनी या फोटोत रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजाला देखील टॅग केलेले आहे. फॅन्सनी देखील जाफर यांच्या फोटोवर मजेशीर कमेंट केलेल्या आहेत.
जाफर यांनी या मेसेजमधून पंतला सल्ला दिला आहे की, जेव्हा वॉर्नर फलंदाजीसाठी येईल तेव्हा तू बुटा बुमा हे गाणं गा, जेणेकरून वॉर्नर डान्स करण्यासाठी क्रिजच्या बाहेर येईल व तेव्हा तू त्याला यष्टीचीत करशील.
Easy one for you @RishabhPant17 #decode 😉 #AUSvIND
Cc: @ashwinravi99 @imjadeja pic.twitter.com/8UJazm7Kh4— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 5, 2021
दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, लॉकडाऊनमध्ये वॉर्नरने दक्षिणात्य चित्रपटातील बुटा बुमा या गाण्यावर मजेशीर डान्स केला होता. तसेच त्याचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळेच जाफर यांनी विनोदी शैलीने ही पोस्ट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
किवींकडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत; झेलावा लागला २० वर्षातील दुसरा सर्वात मोठा पराभव
सौरव गांगुलींना आलेल्या हार्ट अटॅकमुळे ‘या’ कंपनीने हटवल्या जाहिराती
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल