न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील तीन कसोटी सामन्यापासून केन विलियम्सनच्या बॅट मधून दोन द्विशतक निघाले आहेत. नुकत्याच पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा त्याने शतक ठोकले होते. त्यानंतर त्याने दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही 238 धावांची द्विशतकीय खेळी साकारली आहे. यामुळे सध्या केन विलियम्सनचा बोलबाला दिसून येत आहे. भारताचे माजी खेळाडू वसीम जाफर यांनी केन विलियम्सनची स्तुती करताना एक मीम शेअर केले आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात नुकतीच कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात केन विलियम्सनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने 101 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात केन विलियम्सनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत केन विलियम्सनला पहिले स्थान दिले आहे. त्यानंतर आता पुन्हा विलियम्सनने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत केलेल्या द्विशतकी खेळीने आपले पहिले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळे सर्व लोक त्याची स्तुती करत आहेत.
केन विलियम्सनबद्दल माजी भारतीय खेळाडू वसीम जाफर यांनी ट्विटरवर एक मीम शेअर केला आहे, ज्यामधे लिहले आहे की, “रोज उठा, आंघोळ करा विलियम्सनचे कौतुक करा, झोपा.(रोज उठो, नहाओ, नहाओ, विलियम्सन की तारीफ करो और सो जाओ).”
#KaneWilliamson #NZvsPAK pic.twitter.com/rX6HHaJdTi
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) January 5, 2021
त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुद्धा केन विलियम्सनचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की केन विलियम्सनचे सातत्य पाहून आश्चर्य वाटत नाही. प्रत्येक कसोटी सामन्याच्या तयारी करताना प्रत्येक घटकाकडे दिलेले बारी लक्ष आणि कार्य नीती हे त्याच्या यशाचे कारण आहे. प्रत्येक युवकासाठी तो एक आदर्श आहे.
Not at all surprised to see the consistency of Kane Williamson. Unbelievable work ethics and attention to detail while preparing for any match are the reasons behind his success. A true role model for any youngster to emulate. #NZvPAK pic.twitter.com/TCoF3bAcyk
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 4, 2021
नुकत्याच संपलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 7000 व त्यापेक्षा जास्त धावा करणारा केन विलियम्सन तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पूर्वी ही कामगिरी रॉस टेलर आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी केली आहे. परंतु सर्वाधिक वेगाने हा टप्पा पूर्ण करणारा केन विलियम्सन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
💯💯 Kane Williamson brings up his double ton!
What an innings by the New Zealand captain! That is his fourth double century – joint-highest with Brendon McCullum among 🇳🇿 batsmen!#NZvPAK SCORECARD ▶ https://t.co/eVFtwym5wg pic.twitter.com/gp0U4dlaqt
— ICC (@ICC) January 5, 2021
त्याचबरोबर न्यूझीलंड संघाकडून सर्वाधिक जास्त द्विशतक करण्याच्या ब्रॅडन मॅक्क्युलमच्या विक्रमाशीही केन विलियम्सनने बरोबरी केली आहे. या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाकडून प्रत्येकी 4 द्विशतके ठोकली आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने 1 डाव आणि 176 धावांनी पाकिस्तान संघावर विजय मिळवला. या सामन्यात पहिल्या डावात न्यूझीलंड संघाकडून केन विलियम्सनने 238 धावांची खेळी केली. त्याबरोबर हेन्री निकोलस 157 आणि डार्ली मिशेल 102 धावांची शतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ रहाणेकडे तब्बल ४३ वर्षांनंतर सिडनीमध्ये ‘अशी’ कामगिरी करण्याची संधी
ऑसी फलंदाज टीम इंडियविरुद्ध जास्त धावा का करू शकले नाहीत? लँगरनी सांगितले कारण
सूर गवसण्यासाठी स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरला करावे लागेल ‘हे’ काम, कोच लँगरचा सल्ला