येत्या काही दिवसांत श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. १३ जुलै रोजी सुरू होणारी ही बहुप्रतिक्षित मालिका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता शनिवारपासून (१७ जुलै) वनडे सामन्याने या मालिकेचा थरार रंगणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका संघाने मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार कुशल परेरा याची हकालपट्टी करत नवा कर्णधार म्हणून दसुन शनाकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन माजी भारतीय रणजीपटू वसिम जाफर यांनी श्रीलंका संघ व्यवस्थापनाची मजा घेतली आहे.
खरे तर, शनाका हा २०१७ नंतर श्रीलंका वनडे संघाचा तब्बल दहावा कर्णधार आहे. त्याच्यापुर्वी उपुल थरंगा, एंजेलो मॅथ्यूज, चमारा कपुगेदरा, लसिथ मलिंगा, थिसारा परेरा, दिनेश चंडीमल, दिमुथ करुणारत्ने, लहिरू थिरिमाने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेच्या वनडे संघाचे नेतृत्त्व केले आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर, मागील ४ वर्षांत श्रीलंकाने दर दुसऱ्या वनडे मालिकेनंतर कर्णधार बदलला आहे. याच मुद्द्यावरुन जाफर यांनी श्रीलंका संघाला ट्रोल केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्वीट करताना लिहिले की, ‘यार इतके तर मुलेही त्यांची डीपी बदलत नाहीत, जितके श्रीलंकाने कर्णधार बदलले आहेत.’ यापुढे त्यांनी हसतानाचा इमोजीही टाकला आहे.
Yaar itne to ladke dp nahi badalte jitne SL ne captain badle hai. 😅 #SLvIND https://t.co/7dXJnGGwb6
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 9, 2021
शनाकापुर्वी श्रीलंकेच्या वनडे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पार पाडलेला कुशल परेरा याची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. त्यामुळे श्रीलंका संघाने त्याची सुट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ मध्ये कुशल परेराची वनडे संघाच्या नेतृत्तवपदी निवड झाली होती. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ ६ पैकी फक्त १ सामना जिंकू शकला. त्यामुळे त्याच्याजागी आता दसुन शनाकाला नवा कर्णधार नियुक्त करण्यात येणार आहे. अशात तो तरी संघाच्या अपेक्षांवर खरा उतरेल की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम धवनशी भिडणार श्रीलंकेचा नवा संघनायक, मागील ४ वर्षांत बदललेत चक्क ‘इतके’ कर्णधार
बरोबरीची टक्कर! भारताविरुद्ध उतरणार श्रीलंकेचा ‘नवा संघ’, इंग्लंडवरुन परतलेले खेळाडू संघाबाहेर?
टीम धवनशी भिडणार श्रीलंकेचा नवा संघनायक, मागील ४ वर्षांत बदललेत चक्क ‘इतके’ कर्णधार