क्रिकेट जगतात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी आपला खेळ सुधारण्यासाठी इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटचा आधार घेतला. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही काऊंटी क्रिकेटमध्ये आपला खेळ सुधारला होता. तरी आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
तो म्हणाला की, जसप्रीत बुमराहसारख्या (Jasprit Bumrah) गोलंदाजाला जर भविष्यात काऊंटी क्रिकेट आणि विश्रांती यांमधील कोणतेही एक निवडण्यास सांगितले, तर त्याने विश्रांतीची निवड केली पाहिजे.
भारतीय संघाचा माजी कसोटी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोपडाबरोबर (Aakash Chopra) झालेल्या चर्चेत अक्रम म्हणाला की, “आता काळ बदलला आहे. आता मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जाते. त्यामुळे गोलंदाजांच्या शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे.”
“भारतीय संघाचे खेळाडू वर्षभर क्रिकेट खेळतात. बुमराह या घडीचा भारताचा अव्वल गोलंदाज आहे. तसेच जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मी त्याला सल्ला (Advice) देईल की, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येत नसेल, तर त्याने विश्रांती घेतली पाहिजे,” असेही अक्रम पुढे म्हणाला.
अक्रमने स्वत:बद्दल सांगताना म्हटले की, “मी ६ महिने पाकिस्तान आणि ६ महिने लंकेशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळत होते. परंतु तो काळ वेगळा होता.”
अक्रमने युवा वेगवान गोलंदाजांना अधिकाधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचाही सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, “युवा गोलंदाजांनी टी२० क्रिकेटपासून नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून अधिक शिकावे, अशी माझी इच्छा आहे.”
“टी२० क्रिकेट अप्रतिम आहे. त्यामध्ये अधिक मजा आणि पैसाही आहे. खेळाडूंना याबद्दल असलेले महत्त्व मला माहित आहे. परंतु कोणत्याही गोलंदाजाची चाचणी ही टी२० क्रिकेटपासून नाही कसोटी क्रिकेटमधून होते,” असेही तो म्हणाला.
आकाशने यादरम्यान अक्रमला त्याच्या लॉकडाऊनमधील दिनचर्येबद्दल आणि क्रिकेट कारकीर्दीविषयी विचारले. यावर अक्रम म्हणाला की, “कराचीमध्ये सकाळी ६ वाजता कोणीही नसते, त्यामुळे त्यावेळी मी रनिंग करतो. मुलाबरोबर खेळतो. पत्नीला वॉकवर घेऊन जातो. तसेच वर्कआऊट केल्याने मला ताजेतवाने वाटते. ज्या दिवशी मी वर्कआऊट करत नाही, तेव्हा खूप कसं तरी वाटतं. याबरोबरच मी वेळेवर झोपतो.”
अक्रमने पुढे सांगितले की, “मी कधीच खेळपट्टी पाहिली नाही. मी केवळ चेंडू स्विंग करण्यावर लक्ष देत होतो. तसेच मी सावकाश खेळपट्टीवर उसळी चेंडूचा अधिक वापर केला, ज्यामुळे फलंदाजांना समस्या निर्माण होत होती.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कोचने केली होती स्कर्ट घालून फलंदाजी
-८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी
-कसोटी सामन्यात ४०० धावा करणारे जगातील ४ फलंदाज, एक खेळाडू आहे…