भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६८ धावांच्या फरकाने जिंकला. अशाप्रकारे वनडे मालिकेनंतर टी२० मालिकेची सुरुवातही वेस्ट इंडिजसाठी निराशादायी ठरली. यानंतर आता यजमान वेस्ट इंडिज संघाचे आणखी नुकसान झाले आहे. षटकांची गती कमी राखल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघावर आयसीसीने दंड ठोठावला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघावर निर्धारित वेळेत १ षटक कमी टाकल्याने (Slow Over Rate) दंड ठोठावण्यात आला आहे. याअंतर्गत त्यांच्या सामना शुल्कातील २० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. सामना रेफरी रिची रिचर्डसन यांनी वेस्ट इंडिजच्या संघावर त्रिनिदाद येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यानंतर कारवाई केली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत वेस्ट इंडिजच्या संघाला षटकांची गती कमी राखण्यासाठी दोषी पकडले आहे.
यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्यावर सामना शुल्काच्या २० टक्के रक्कमेचा दंड लावण्यात आला आहे. कर्णधार पूरनने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे कोणतीही सुनावणी करण्याची गरज भासली नाही.
दरम्यान पहिल्या टी२० सामन्यात (First T20I) भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक ६४ धावा केल्या होत्या. तसेच दिनेश कार्तिकने १९ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकाराच्या साहय्याने नाबाद ४१ धावांचे योगदान दिले होते.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजकडून कोणत्याही खेळाडूला फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही. वेस्ट इंडिजकडून शामराह ब्रूक्सने सर्वाधिक २० धावा केल्या. या डावात अर्शदीप सिंग, आर अश्विन, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जिम्बाब्वे दौऱ्यातून विराटची माघार; नेटकरी म्हणाले, ‘अजून किती वेळ…?’
मीराबाई चानूनंतर वेटलिफ्टिंगमध्ये आणखी पदक, बिंदियाराणीने रौप्य पदकावर कोरले नाव
‘मी माझ्या मनाचं ऐकलं अन् जे झालं ते…’, अर्शदीप सिंगने सांगितलं पडद्यामागील रहस्य