वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) सध्या आंतरराष्ट्रीय लीग टी20 (ITL 2025) मध्ये आबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळत आहे. स्पर्धेतील 27व्या सामन्यात शानदार कामगिरी करून रसेलने 9,000 टी20 धावा पूर्ण केल्या. रसेलने हा आकडा साध्या पद्धतीने गाठला नाही, तर त्याने टी20 मध्ये 9,000 धावांचा टप्पा ओलांडून वर्ल्ड रेकाॅर्ड केला.
आंद्रे रसेल (Andre Russell) टी20 मध्ये सर्वात जलद 9,000 धावा करणारा फलंदाज ठरला. रसेलने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Russell) मागे टाकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. रसेलने सर्वात कमी चेंडूंमध्ये हा आकडा गाठला. मॅक्सवेलने 5,915 चेंडूंच्या मदतीने टी20 क्रिकेटमध्ये 9,000 धावांचा टप्पा ओलांडला. तर रसेलने फक्त 5,321 चेंडूत ही कामगिरी केली.
टी20 मध्ये सर्वात जलद 9,000 धावा करणारा फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)-
आंद्रे रसेल – 5,321 चेंडू
ग्लेन मॅक्सवेल – 5,915 चेंडू
एबी डिव्हिलियर्स – 5,985 चेंडू
किरॉन पोलार्ड – 5,988 चेंडू
ख्रिस गेल – 6,007 चेंडू
अॅलेक्स हेल्स – 6,175 चेंडू
आंद्रे रसेलने (Andre Russell) आंतरराष्ट्रीय टी20 लीगच्या 27व्या सामन्याद्वारे 9,000 टी20 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. हा सामना आबू धाबी नाईट रायडर्स आणि गल्फ जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रसेलने 2 चौकारांच्या मदतीने 6 चेंडूत फक्त 9 धावा केल्या, ज्याच्या मदतीने त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा वर्ल्ड रेकाॅर्ड केला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; अभिषेक शर्माचे झंझावाती शतक, भारताचे इंग्लंडसमोर 248 धावांचे आव्हान
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू
IND vs ENG; अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झळकावले तुफानी शतक