क्रिकेट प्रेमींसाठी सध्या पर्वणी सुरु आहे. सध्या जवळपास रोजच वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट सामने पाहायला मिळत आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीग सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटही व्यस्त आहे. नुकताच वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला आहे. साधारण १ महिन्याच्या या दौऱ्यात वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश विरुद्ध ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
वनडे मालिका –
वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याला बुधवारपासून (२० जानेवारी) वनडे मालिकेने सुरुवात होईल. या मालिकेतील पुढील दोन सामने २२ आणि २५ जानेवारीला होणार आहेत. पहिला आणि दुसरा वनडे सामना ढाका येथे तर चटगांव येथे तिसरा वनडे सामना होईल. या तिन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.
कसोटी मालिका –
वनडे मालिका संपल्यानंतर वेस्ट इंडिज बांगलादेश विरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्याआधी २९ ते ३१ जानेवारीदरम्यान वेस्ट इंडिज बांगलादेश अध्यक्षयी एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळले. त्यानंतर ३ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना चटगांव येथे होईल. तर दुसरा सामना ढाका येथे ११ फेब्रुवारीपासून सुरु होईल. या दोन्ही सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल.
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकांचे वेळापत्रक –
वनडे मालिका –
२० जानेवारी – पहिला सामना – ढाका, वेळ – सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
२२ जानेवारी – दुसरा सामना – ढाका, वेळ – सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
२५ जानेवारी – तिसरा सामना – चटगांव, वेळ – सकाळी ११ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
सराव सामना –
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश अध्यक्षयी एकादश, २९ ते ३१ जानेवारी, वेळ – सकाळी १० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
कसोटी मालिका –
३ ते ७ फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना, चटगांव, वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
११ ते १५ फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना, ढाका, वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने
शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ
अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू