हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून केदार जाधवने 87 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत केदारने 9 चौकार आणि 1 षटकार मारले. तर एमएस धोनीने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 59 धावा केल्या. त्याचबरोबर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर युजवेंद्र चहलने केदारला धोनीबरोबरच्या एकेरी, दुहेरी धावांबद्दल विचारले तेव्हा केदार म्हणाला, ‘मी याआधीही हे सांगितले आहे, माही भाई मला जे काही करायला सांगतो ते मी डोळे झाकून करतो आणि मी यशस्वी होतो.’
Chahal TV IS BACK – Your host & dost @yuzi_chahal gets you @imkuldeep18 & @JadhavKedar together to relive the 1st ODI win & discuss the @msdhoni magic – DO NOT MISS THIS – by @28anand #TeamIndia #INDvAUS
Full Video Link 😍😎👉👉 – https://t.co/zR1kBUViiZ pic.twitter.com/EfQRNWO2mc
— BCCI (@BCCI) March 3, 2019
याबरोबरच केदारने सामन्यानंतर प्रेसेंटेशन वेळीही धोनीची फलंदाजी करताना मदत होत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने विराट कोहली आणि धोनीचे कौतुक करताना म्हटले आहे की ‘धोनी आणि विराट हे आव्हानाचा पाठलाग करताना सर्वोत्तम आहेत. त्यांची जी प्रत्येक वेळी तीव्रता असते. हेच आम्ही कर्णधाराकडून शिकतो आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो.’
भारताच्या सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्यानंतरही केदार आणि धोनीने भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी उचलत विजय मिळवून दिल्याने कर्णधार कोहलीनेही त्यांचे कौतुक केले आहे.
याआधीही जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात केदार आणि धोनीने 121 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट, शमीने एकमेकांना दिली नवीन टोपन नावे, वाचा
–भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या केदार-धोनी जोडीने केला हा मोठा पराक्रम
–आयपीएल फॅन्स!!! मुंबई इंडियन्सची नवी जर्सी पाहिली का?