---Advertisement---

ओव्हरमधील पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारलेल्या रोहितला पुढे काय करायचे होते पहाच…

---Advertisement---

गुरुवारी (7 नोव्हेंबर) राजकोट (Rajkot) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा टी20 सामना (2nd T20 Match) पार पडला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 43 चेंडूत 85 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

“मी मोसादिक हुसेनच्या (Mosaddek Hossain) गोलंदाजीवर 3 षटकार मारले. त्याच्या पुढच्या चेंडूूवरही षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, मला षटकार मारता आला नाही. यानंतर मी एक धाव घेतली,” असे रोहित सामन्यानंतर युजवेंद्र चहलशी बोलताना म्हणाला.

2007ला दक्षिण आफ्रिकेत (South Africa) भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघात टी20 विश्वचषक पार पडला होता. या सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडच्या (Stuart Broad) गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार मारले होते.

काल झालेल्या सामन्यात रोहितला युवराज सिंगचा हा विक्रम मोडण्याची संधी होती. परंतु, ते शक्य झाले नाही. त्याला फक्त 3 षटकार मारता आले.

“षटकार मारण्यासाठी मोठी शरीरयष्टी लागत नाही. यजुवेंद्र चहलही (Yuzvendra Chahal) षटकार मारू शकतो. षटकार मारण्यासाठी फक्त ताकत लागत नाही तर, योग्य वेळपण साधता आली पाहिजे. फलंदाजी करताना चेंडू बॅटच्या मधोमध लागला पाहिजे आणि तुमचे डोकं स्थिर पाहिजे,” असेही रोहित यावेळी म्हणाला.

रोहितने 2019 या वर्षात कसोटी, वनडे आणि टी20 या तीनही क्रिकेट प्रकारात सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने या वर्षात एकूण 66 षटकार मारले आहेत. रोहितने ही कामगिरी सलग तिसऱ्या वर्षी केली आहे.

#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

74 षटकार – रोहित शर्मा – 2018

66 षटकार – रोहित शर्मा – 2019

65 षटकार – रोहित शर्मा  – 2017

63 षटकार – एबी डिविलियर्स – 2015

59 षटकार – क्रिस गेल – 2012

#2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

66 षटकार – रोहित शर्मा

58 षटकार – ख्रिस गेल

51 षटकार – ओएन मॉर्गन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---