---Advertisement---

पुन्हा वानखेडेवरच धोनी मारतो २०११ विश्वचषकासारखा षटकार

---Advertisement---

मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०११ विश्वचषकात जो कायम आठवणीत राहील असा षटकार मारला होता त्याची पुन्हा आठवण करून दिली आहे. धोनीने २०११ मध्ये षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. त्याच वानखेडे मैदानावर आज पुन्हा धोनीने काहीसा तसाच षटकार खेचला.

भारत-न्यूजीलँड वनडे मालिका रविवारपासून वानखेडे वनडेने होणार आहे. त्यामुळे भारतीय संघ दिवाळीची सुट्टी संपवून सरावासाठी आज मुंबईमधील वानखेडे मैदानावर आला होता. यावेळी ऑफ स्पिनर गोलंदाजाला धोनीने एक जबदस्त षटकार खेचला.

याचा विडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. हा ट्विट करताना बीसीसीआयनेही काहीसा असाच कॅप्शन यासाठी वापरला आहे.

आज नेटमध्ये सरावात कर्णधार कोहली, अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासह बाकी खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला.

तर यावेळी पत्रकार परिषदेत मुंबईकर रोहित शर्माने हजेरी लावली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment