आतापासून अवघ्या चार महिन्यांनंतर बीसीसीआय आयपीएलच्या 14 व्या सत्राचे आयोजन करेल. तथापि, यापूर्वी बीसीसीआय मोठा लिलाव आयोजित करेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर देखील सापडले आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये बीसीसीआय या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.
माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व 8 संघ मालकांना सांगितले आहे की ते डिसेंबरमध्ये मेगा लिलावावर निर्णय घेतील. तसेच पुढच्या हंगामात नवीन संघ लीगमध्ये आणली जाईल की नाही? डिसेंबरमध्येच या विषयावर निर्णय घेण्यात येईल.
डिसेंबरमध्ये मेगा लिलाव होणार, डिसेंबरमध्येच निर्णय!
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने सर्व संघांना कळविले आहे की डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात बीसीसीआय मेगा लिलावाचा निर्णय घेईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘वेळ कमी आहे पण प्रत्येकाला मोठा लिलाव व्हावा अशी इच्छा आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल 3 ते 4 आठवड्यांत या विषयावर बोलणार आहे. आयपीएलमध्ये नवीन संघ आणण्याच्या विषयावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत असे काही सांगितले नाही. तर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.’
आयपीएल २०२० च्या कामगिरीकडे बारकाईने पाहिले तर पुढील वर्षासाठी मोठा लिलाव झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्सला होईल. हंगामाच्या अखेरच्या सामन्यानंतर स्वत: एमएस धोनीने म्हटले आहे की पुढील लिलावात त्याच्या संघाला नव्याने उभे रहावे लागेल.
बीएससीआयने संघांशी लिलावाच्या मुद्द्यावर चर्चा केली असल्याचेही सांगितले जाते. बीसीसीआयच्या या विषयावर केवळ चेन्नई सुपर किंग्स नव्हे तर राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे देखील संघ चर्चेत आहे. तर काही संघ मोठ्या लिलावाच्या बाजूने नाहीत. रिपोर्टनुसार दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स त्याच्या विरोधात आहेत. आता बीसीसीआय डिसेंबरमध्ये काय निर्णय घेते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.